समांतर...
लेखक - सुहास शिरवळकर.
मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते....
मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांची "समांतर" ही कादंबरी काल वाचली.एकूण 197 पानांची असलेली ही कादंबरी आपल्याला अनेक वळणांवर फिरून आणते,कधीतरी ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाते तर कधी आपले जीवन भविष्य काळात किती सुखकर यासाठी वर्तमान काळात आपल्याला आपल्या विचारांशी तडजोड करायला लावते....
"सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेली खूप उंचीची ही कादंबरी आहे जी की प्रत्येकाने वाचायला हवी...
मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती.इथंच काय,या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो.वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली...
'त्याचं मन मोडायचं नाही,म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही..! "सुहास शिरवळकर" यांची ही आणखी एक समांतर कादंबरी आपल्याला एका वेगळ्या जगात नेऊन सोडते...
भविष्य पाहण्यात विशेष रस नसणारा पण मित्राच्या हट्टापोटी कादंबरीचा नायक कुमार महाजन एक साधु बाबाकडे जातो,त्या चाळेची असलेली अवस्था मरगाईला आलेली ती शेवटची घटका मोजनारी चाळ.पावलांना सावरत कुमार व त्यांच्या मित्राचे तिथं जाणे,दरवाज्याच्या समोर बसलेली वृध्द बाई जी आंबा खाते आहे. साधुबाबाने कुमार यांचा हात बघणे,हातावर असलेल्या भविष्य दर्शिविनाऱ्या रेषा पूर्वाश्रमीच्या एका व्यक्तीशी जुळून येणे त्याचे भविष्य जाणून असल्याने साधू बाबांचे कुमार यांचे नशीब न बघणे...
परिस्थितीपुढे हतबल असलेला कुमार त्रागा करून तिथून निघणार इतक्यात ज्योतिषी त्याला २५-३० वर्षांपूर्वी कोणी चक्रपाणी व्यक्तीचा हात कसा कुमारच्या हाताशी तंतोतंत मिळता सांगतो.
तिथून चक्रपाणी चा शोध हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून कुमार कामाला लागतो. बऱ्याच संकटाना तोंड देत एकदाचं चक्रपाणी ची भेट होते. दोघांच्या भूतकाळातील गोष्टींमधे किती साधर्म्य आहे हे जाणताच दोघे चाट पडतात.
चक्रपाणीचा भूतकाळ हे कुमारच भविष्य आहे.
खूप फिरल्यानंतर चक्रपाणी कुमारला भेटणे,त्यासाठी त्याला करायला लागणारा प्रवास विचारपूस हे थक्क करणारे आहे.पुढे काय होणार,उद्या काय होणार,परवा काय होणार,शेवटी काय होणार अशी उत्कंठा लागते; पण शेवट मात्र अधांतरीच असतो.कारण या कादंबरीतील पात्रे समांतर आयुष्य जगत असतात.समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय अधिच्याला मुक्ती मिळत नाही.शेवटी चक्रपाणीची होणारी सुटका अन् चक्रपाणी ज्या ठिकाणी वास्तव्यास असतो तिथे कुमारचे जाणे...
हे नेमकं काय आहे, यासाठी कादंबरी वाचायला हवी....
Written by
Bharat Laxman Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा