खिडकी पलिकडे खूप काही ...
संध्याकाळचे ओस पडलेले प्रश्न आणि शहर...
माणसांचे विचार करणे असो किंवा विचार करून निर्णय घेणं असो अलिकडे हे सर्वच मला गुंतागुंतीचे वाटायला लागले आहे.शहरे ओस पडली व वाहते रस्ते संथ झाले,बंद खिडकीची तावदाने पुसल्या गेली,रेलिंगचा पडदा ओढल्या गेला....
कित्येकदा कुणी अनोळखी पुरुष,स्त्री समोरून जात असेल व कित्येकदा मी तो ओढून घेत असेल.कारण एकच होतं की,माझ्या घरा आतले जग मला कुणाला दाखवायचं नव्हते,मग तोच पडदा त्याच्या नजरेत आपली खिडकी असतांना आपून ओढावा.
काय वाटलं असेल त्या माणसाला काही क्षण...?
मनात इतकचं उत्तर येतं की तो परका,अनोळखी आहे.म्हणून आपण पडदा ओढून घेतला,ग्रील पुढे सरकवली.झालं इतकचं आपण आपल्या कृतीतून व्यक्त केलं आणि एक व्यक्तीचा आपल्यासाठी गैरसमज झाला.म्हणुनच मला विचार करणे अन् विचार करून निर्णय घेणं हल्ली गुंतागुंतीचे वाटते,विचार केला की असे गैरसमज होतात अन् मग उगाच मनाला पडणारे असंख्य प्रश्न येणारे विचार etc,etc....
सांगत होतो की,
खिडकीची तावदाने पुसल्या गेली,रेलिंगचा पडदा ओढल्या गेला आणि आता माझी नजर शांत झालेल्या रस्त्याकडे लागलेली असते.कुणाच्या शोधात तर माणसांच्या कारण आता नाही दिसत तो,ती मोकाट फिरणारे जनावरे,गाड्या,नसतो हॉर्नचा आवाज की नसते काही की काही सगळं थांबलं आहे.
होय एक मात्र आता दिसून येतं आहे की,आता लोकं सायंकाळच्या वेळी खिडकी उघडून बाहेरचं जग न्याहाळत बसलेली असता.कारण आता बाहेर जाणं बंद झालं आहे अन् सोबतच त्या अनोळखी माणसाचं रस्त्यावरून जाताना आपल्या खिडकीकडे नजरचुकीने बघणही थांबलं आहे....
Written by
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा