मुख्य सामग्रीवर वगळा

बलुतं- दया पवार

बलुतं.
लेखक - दया पवार.

पु. ल. देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे खरोखर "बलुतं" वाचल्याने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या श्रद्धा गळून पडतात...

'बलुतं' दया पवार यांचे प्रचंड गाजलेलं व जातिव्यवस्थेवर भाष्य करणारं हे पुस्तक,जे खुप चर्चेत राहिले,आजही आहे.हे पुस्तक मराठी भाषेतील,साहित्यातील पहिले दलित आत्मचरित्र म्हणून याकडे पाहिलं जातं.धगधगत समाजवास्तव्य त्यातील दाहकता उपेक्षित,वंचित,शोषित अशा सर्वहारा माणसाचं जगणं आणि जाणीव या पुस्तकाने मांडली.

जात,वर्ग,लिंगभेदाच्या वर्तुळात अडकलेल्या भारतीय समाज आणि भांडवलशाहीने घोटलेला गळा अशा गुदमरलेल्या अवस्थेतंल जमीनेचे दुःख आकाशाला टांगण्याचे काम या 'बलुतं' ने केले.देशात बऱ्यापैकी स्वातंत्र्याचे वारे चौफेर वाहू लागले होते.देश स्वतंत्र झाला पण देशाचा नागरिक मात्र जाती व्यवस्था,धर्म,परंपरागत चालत असलेल्या रुढी परंपरा यात बरबटलेला.समाज मात्र स्वतंत्र मिळवूनही जातीव्यवस्था,धर्म यांना धरून असलेले रुढीजात विचार यामुळे स्वातंत्र्यातही पारतंत्र्य अनुभवत होता.

जातिवादाशी तो लढा देत होता,यासर्वात परिवर्तन व्हावं म्हणून एका बाजुला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आधुनिक विचारांची कास धरून सामान्य जनतेला नव्या विचारांना आपल्या जीवनात स्वीकारून जगण्यासाठी शिकवत होते,पिढीजात चालत असलेल्या परंपरांना बदलू बघत होते....

परंतु एकीकडे समाज हे स्वीकारायला तयार नव्हता अन् यातूनच मानव असंख्य अडचणींना सामोरं जात होता,हे बऱ्याच जणांना कळत होते.बदल व्हावा त्यांनाही वाटत होते पण "अठरा विश्व दारिद्र्य" मोठ्यांचा मान यापुढे काही करता येत नव्हते.कुठेतरी एक आशेचा किरण दिसत होता,परिवर्तनाची लाट निर्माण होत होती या सर्वात "दया पवार" यांचा सर्व काही कळूनही जीवनाशी चालू असलेला संघर्ष या ठिकाणी त्यांनी "बलुतं" मधुन लिहला आहे....

"दया पवार" यांचे जीवन जातिव्यवस्थेचे (त्यातही ती भारतातील ग्रामीण भागातील) त्यांनी अनुभवलेले चटके यांचे चित्रण या पुस्तकात त्यांनी शब्दांची जोड देत चितारले आहे.हे वाचून नक्कीच जातिव्यवस्थेमुळे एक सामान्य माणसाला किती गोष्टींना सामोरे जावे लागते याचे जिवंत वर्णन यामाध्यमातून त्यांनी केलं आहे,जे वाचतांना नकळत डोळ्यासमोर तो काळ येऊन जातो.आपसूक मनी एक हुरहूर मनास लागून जाते आज समाजात झालेले परिवर्तन,सुशिक्षित झालेला समाज यामुळे आज कुठेतरी हे सहन न होणाऱ्या चटक्यांची धग कमी होण्यास कारणी ठरत आहे...

जी कामं घाणेरडी,ज्या नोकऱ्या उच्चजातीतील लोक करणार नाहीत,त्या नोकऱ्या दलितांच्या.हे वास्तव जसं "बलुतं" मधील दगडू पवारने अनुभवलं, तसंच आपल्या समाजातील हजारो दगडू आज देखील अनुभवत आहेत,परिवर्तनाची लाट अन् बदलणारे विचार यामुळे आता यात हळूहळू बदल होत आहे,पण त्यावेळी हे सर्व बदल स्वीकारताना दगडूला आलेल्या असंख्य अडचणी,बालवयात त्याच्या मनावर झालेलं तो आघात त्यातून सावरत,शिक्षणाची मशाल हाती घेत बदल घडवू बघणारा दगडू अन् वेळोवेळी याला आड येणारे आपलेच माणसं याचं सविस्तर वर्णन दया पवार या पुस्तकाच्या माध्यमातून करत आहेत.

पिढ्यानपिढ्या गावातील ज्या गलिच्छ कामांचे दलित गुलाम होते,ती कामं नाकारल्यानंतर गावच्या अर्थव्यवस्थेने देखील दलितांना नाकारलं आणि शहरांतील टीचभर जागेत गुलामीचं नवं जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली.यात चहूकडून होणारी त्यांची ससेहोलपट या पुस्तकांतुन त्यांनी व्यक्त केली आहे,नक्कीच वाचावं असं हे पुस्तक जे परिवर्तनाची पहाट रोजच आपल्या सोनेरी पानांतून समाजाला देत आहे...

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...