एक उमदे नेतृत्व..!
आज अनेकांना माझी ही पोस्ट बघुन जरा आश्चर्य वाटेल.कारण साहित्याच्या पलिकडे माझ्या वॉलवरती इतर विषयावरील पोस्ट या जवळजवळ नसतातच.पण काहीवेळा हे आपलेपण डावलून काहीतरी वेगळं लिहावं लागतं आणि ते आज या कारणासाठी लिहावं लागते आहे याचे दुःख वाटते.
तसा राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेला मी जेव्हा हे लिहतो तेव्हा लिहायला थोडं जड जात असल्यासारखे वाटत आहे.
कारण राजीवजी सातव यांच्या सारख्या अभ्यासू,सुसंस्कृत, उमदे व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला सोडून जाणं हे खुप दुःखद आहे.
राजीवजी सातव हे काँग्रेसचा आश्वासक चेहरा होते.तरुणांचे लाडके नेते होते,तरुणांची योग्य नस,ओढ,कल ओळखलेले ते एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व.राजकारण अन् त्या पलिकडची एक सामान्य व्यक्ती कशी असावी तर ती राजीवजी सातव यांच्यासारखी.
देशाच्या राजकारणात युवा पिढी जेव्हा उतरते आहे, जिची निकटच्या काळात फार आवश्यकता आहे आणि हे जाणून राहुल गांधी काँग्रेस पक्षाची विस्कटलेली घडी युवा नेत्यांना सोबत घेऊन व्यवस्थित पुन्हा बसवू बघत आहेत.या सर्वा जडणघडणीत त्यांना राजीवजी यांची कायमची साथ होती,त्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायचा असो किंवा काही चर्चा घडवायची असो त्यावेळी राहुल गांधी राजीवजी यांचे मत विचारत घेत असायचे.
फक्त चर्चेचा बोलबाला न करता,सतत केंद्रस्थानी न राहता दिल्लीत आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे हक्काची जागा निर्माण करणारे व काॅंग्रेस पक्षात आपल्यात असलेली योग्य निर्णयक्षमता,राजकारण जोडीला समाजकारण,काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये एक मोठी जबाबदारी पार पाडणारे एक उच्चशिक्षित,सभ्य नेता,युवानेतृत्व म्हणजे राजीवजी सातव.
त्यांच असे अकाली जाणं हा काँग्रेसला बसलेला खूप मोठा धक्का तर आहेच,परंतु युवावर्ग ज्या नेत्याकडे बघून राजकारणात,समाजात आपले स्वतंत्र मत व्यक्त करायला शिकला होता ते फक्त राजीवजी सातव यांच्यामुळे ज्यांच्या जाण्याने आपण देशाच्या राजकारणातील एका उमदे नेतृत्व आज गमावून बसलो याचे दुःख वाटते...
- Bharat.L.Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा