घर माझे कौलारू..!
घर माझे कौलारूचे गणित आयुष्याचे,
चौकटीच्या आत दडले जीवन माझे,
फासे फिरले मिळण्या उत्तर आयुष्याला बंद खिडकीचे..!
नभी दाटून आल्या दर्शन तारकांचे,
सांजप्रहरी अस्ताला जावे भास्कराने,
झाल्या रानवाटा मोकळ्या रस्ते जवळ झाले घराचे..!
भासे मज आयुष्य बिजागिरी सम,
खुलले दरवाजे आयुष्याचे दडले जीवन घरात माझे,
उघडझाप करण्या हिशोब तो जिंदगीचा,झाले बंद पुन्हा दरवाजे..!
काय सांगावे गणित बोडक्या बाभळीस,
जीवन उलगडले,झाले सोहळे अंगणी गुलमोहराचे,
बंद खिडकीतून दुनियेस त्या पहाणे,
बिथरले जीवन खिडकीतून बाहेरच्या जगास मग मात्र ते न्याहाळणे...
घर माझे कौलारूचे गणित आयुष्याचे,
चौकटीच्या आत दडले जीवन माझे,
फासे फिरले मिळण्या उत्तर आयुष्याला बंद खिडकीचे..!
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा