जहं जहं चरन परे गौतम के.
लेखक - तिक न्यात हन्ह.
पुस्तकाचे नाव - जहं जहं चरन परे गौतम के.
लेखक - तिक न्यात हन्ह.
एकुण पृष्ठ - 576.
अभिप्राय - जहं जहं चरन परे गौतम के. भाग- पहिला.(पृष्ठ क्र १ ते २०१)
हे पुस्तक महात्मा भगवान बुद्ध यांचे जीवन जे त्यांनी पंचशील तत्वांना स्विकारत जगले आहे,मानवानं एक यशस्वी जीवन कसं जगावं ते भगवान बुद्ध कसे जगले,हे जीवन जगतांना त्यांच्या आयुष्यात किती कठीण काळ त्यांनी व्यथित केला अन् याचे फळ म्हणुन त्यांना जीवन जगण्याच्या साधनेतुन मिळालेला मार्ग.या सर्व तत्वांना आयुष्यात स्विकारुन त्यांनी स्विकारलेले जीवन,संपूर्ण जीवनयात्रा यावर लेखकानं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखकाने या जीवन जगण्याच्या भगवान बुद्धांच्या तत्त्व आणि जीवनक्रमाचा स्विकार करून,अथक परिश्रम करून हे पुस्तक लिहिले आहे.ज्या ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध गेले,लोकांना यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग ज्या ज्या ठिकाणी त्यांनी लोकांना दिला,त्या त्या सर्व ठिकाणांना लेखकाने भेट दिली तिथं त्यांनी वास्तव्यही केलं आहे...
थोडक्यात लेखकाबद्दल
"तिक न्यात हन्ह" हे व्हियतनाम येथील प्रसिद्ध असे बौद्ध विचारक आहे,सोबतच ते आध्यात्मिक गुरु आणि कवि सुध्दा आहे.ज्यांचं लेखन जगभरातील वाचकांनी वाचलं आहे,स्विकारलं आहे.त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत,जी आपल्या जीवनाला एक योग्य दिशा देण्याचं काम करत आहेत,जे पुस्तकं खूप प्रेरणादायी आहेत...
हिन्दी साहित्यात यांचे मोठ्या प्रमाणात वाचक आहे,भारतातसुध्दा लोकप्रिय लेखक म्हणून ते ओळखले जातात...
पुस्तकाची सुरुवात होते ती महात्मा भगवान बुद्ध व बाल भिक्खु स्वास्ति यांच्या भेटीने,स्वास्ति हा एक गरीब मुलगा असतो ज्याला की आईवडील लहानपणीच सोडुन गेलेले असतात. घरात तो मोठा असल्यानं घरातील लहान भावांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही बाल स्वास्तिवर असते,तो गावातील एका उच्चवर्णीय पुढाऱ्यांच्या गायी,म्हशी चारण्याचे काम करून आपले घर चालवत असतो.
असेच एक दिवस तो रानात जातो अन् त्याठिकाणी त्याला महात्मा भगवान बुद्ध हे ध्यानस्थ अवस्थेत,एकाग्र चित्ताने ध्यान करताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज तो बघत असतो,काहीवेळाने महात्मा भगवान बुद्ध त्याला बघतात अन् त्याला आपल्यापाशी बोलावतात.त्याच्याशी बोलतात,तो गरीब असल्यामुळे तो त्यांना काही देऊ शकत नसतो...
मग महात्मा भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तू माझासाठी त्या नदीतून गवत आणुन त्याची मला आसन म्हणुन एक गादी करून दे,हिच मला दिलेली तुझी एक भेट असेल.मग तो दर दोन-तीन दिवसांनी ती गादी त्यांना बनवून देतो,यावेळी महात्मा भगवान बुद्ध त्याला सुजाताबद्दल सांगतात.
जी की त्या राज्याची राजकुमारी असते,ती एक दिवस वनातील वनदेव (वनस्पती,झाडे) यांना नैवेद्य दाखवण्यासाठी वनात घेऊन येते.पण त्याचवेळी सुजाताला महात्मा भगवान बुद्ध यांचा ध्यानधारणा करून व वेळीच जेवण न केल्यामुळे चक्कर येऊन पडलेल्या अवस्थेत महात्मा भगवान बुद्ध यांचा कृश झालेला देह रस्त्याच्या एक कडेला पडलेला तिला दिसतो....
मग सुजाता त्यांना नैवेद्यातील दूध पिऊ घालते,मग महात्मा भगवान बुद्ध शुध्दीवर येतात आणि सुजाताला ते आपण चालत असलेल्या जीवन आत्मज्ञानाच्या मार्गाबद्दल सांगतात.पुढे रोज सुजाता त्यांना विविध आहार घेऊन येत असते,अश्यावेळी एक दिवस सुजाता आणि स्वास्ति यांची भेट होते.हळूहळू गावातील बरेचसे बालक महात्मा भगवान बुद्ध यांना भेटण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी तिथे वनात येतात....
काही दिवसांनी महात्मा भगवान बुद्ध पुढच्या प्रवासाला लागतात
त्यांचा जन्म,जन्म होण्यापूर्वी त्यांच्याबद्दल सांगितलेले त्यांचे भविष्य की जगाच्या कल्याणासाठी महात्मा भगवान बुद्ध यांचा जन्म होणार.पुढे जन्म झाल्यावर काही दिवसांनी त्यांची आई त्यांना सोडुन कायमची स्वर्गाला जाणे,त्यांच्या मावशीने आईप्रमाणे त्यांचा सांभाळ करणे.
गरिबांच्या कल्याणासाठी गोरगरिबांना मदत करणे हे कार्य त्यांच्या वडिलांच्या राज्यात महात्मा भगवान बुद्ध यांनी युवा अवस्थेत करणे,परंतु धन,दौलत,चुकीचे व्यवहार यामुळे त्यांचे हे असे जगणे त्यांना नकोसे वाटणे.सत्याच्या मार्गावर व यशस्वी जगण्याच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांचा आग्रह,हे त्यांचे वडील राजा शुध्दोधन यांना पसंत नसणे...
मग महात्मा भगवान बुद्ध यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी विवाह लावणे,राजकुमारी यशोधरा यासुद्धा महात्मा भगवान बुद्ध यांच्या विचारांशी प्रामाणिक असतात.काही दिवसांनी पुढे पुत्र राहुल यांचा जन्म होणे काही दिवसांनी महात्मा भगवान बुद् यांनी संसार त्याग करून संबोधीअवस्थेत जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग शोधण्यासाठी आपल्या राज्याला,परीवाराला सोडून यात्रेस निघून जाणे....
काहीवर्ष ध्यान,अभ्यास आणि पंचशील तत्व स्वीकारून त्यांना संबोधीअवस्था प्राप्त होणे.पुढे हाच जीवनाचा मार्ग आहे हा प्रसार करण्यासाठी त्यांची देशभरात भ्रमंती,यातून त्यांच्या विचारांची जोड घेऊन अनेक जण त्या यशस्वी जीवनाच्या मार्गाला महात्मा भगवान बुद्ध यांच्यासोबत स्वीकारणे....
हेच विचार जगभरात पसरवणे हे कार्य करणे....
फारसे सविस्तर सांगता येणं शक्य नाही त्यासाठी आपल्याला हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे,उर्वरित दोन भाग जसे वाचेल तसे इथे पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल....
Written by
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा