मुख्य सामग्रीवर वगळा

Gautala wildlife sanctuary... Part-3

Gautala wildlife sanctuary...


काल परवा रौद्ररूप धारण केलेल्या वादळांसोबत संपूर्ण महाराष्ट्रभर कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या आणि आता पावसाळा फार दूर नाही याची चिन्ह दिसू लागली.पावसाळा म्हंटले की चहूकडे निसर्गाने आपल्या सौंदर्यावर पांघरलेली हिरवी जरीची शाल,जिथवर नजरेला नजरेने न्याहाळता येईल तिथवर सुंदर निसर्ग,दवाच्या पडण्याने खुललेले तनाचे सौदर्य,वाऱ्याच्या झुळकेमुळे चहुकडे पडलेली फुलांची आरास हे सर्व खूप सुंदर आहे...

तेव्हा आज हेच क्षण अनुभवायला मी भरत सोनवणे आपल्याला अश्याच एका अभयारण्यला भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहे.आपण महाराष्ट्राची इतिहासिक राजधानी म्हणुन ओळखले जाणारे शहर म्हणजेच औरंगाबाद येथील गौताळा अभयारण्याला भेट देणार आहोत,तर चला आज मी तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य भटकंतीसाठी घेऊन जातो...


खूप दिवस झाले lockdown मुळं घरात बसून कंटाळा आला आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे आणि ट्रेकर्सही सज्ज झाले आहे.खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा विषय घेऊन चर्चा होत आहेत तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून माझा हा तुमच्यासाठी गौताळा अभयारण्य सैर करण्याचा एक प्रवास,त्यानिमित्ताने माझ्या माध्यमातून गौताळा अभयारण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख होईल...

तर सकाळच्या प्रहरी बॅग पॅक करून,शूज घालून मी निघालो आहे आजच्या या सफरीवर तर मित्र/मैत्रणींनो गौताळा अभायरण्य अन् सभोवतालचा परिसर याविषयी मी प्रथम काही माहिती सांगतो.

गौताळा अभयारण्य हे मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे अभयारण्य आहे.थोडक्यात या ठिकाणी आल्यावर तुमची कुठलीही निराशा होणार नाही,कारण एकाच तालुक्यात तुम्हाला  ट्रेकिंग करण्यासाठी खूप मोठे अभयारण्य आहे,अनेक व्हिव पॉइंट,विविधतेने नटलेली वृक्ष,वेली संपदा, धबधबे,धरणे,किल्ले,लेणी अन् विविध दर्शनीय स्थळे हे आपल्याला काही 40 ते 50 किलोमीटर आतील अंतरात बघण्यास मिळेल,सोबतीने विविध प्राणी,पक्षी यांचे विलोभनीय दर्शनही होईल...

तर चला गौताळा अभयारण्याच्या दिशेला कन्नडहून 2 कि.मी पुढे गेल्यानंतर एक हिवरखेडा फाटा आहे.या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचतो जे की कन्नड शहराच्या उत्तर दिशेला आहे.प्रवेशद्वराजवळ पोहचले की सर्वप्रथम आपण आपली नोंद एक पर्यटक म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलो आहे म्हणुन करायची आहे आणि आपल्या सोबत आणलेली वाहने तिथे लावून वनविभागाची परवानगी घेऊन, नियमांचे कुठलेही उल्लंघन होणार नाही हा नियम पाळत आपण आता भटकंतीसाठी निघू शकतो...

प्रवेशद्वारापासून सरळ पुढे चालत गेले की,रस्त्याच्या लागून काही अंतराने आपल्याला सर्वप्रथम चंदननाला दिसतो.याचे नाव चंदन नाला यासाठी दिले आहेत की या ठिकाणी पुर्वी बरेचसे चंदनचे झाडे होते पण मानवाच्या वृक्षतोडीमुळे ही झाडे इथे नामशेष होण्याच्या कगारावर आहे,त्यामुळे क्वचितच आपल्याला आता इथे ही झाडे दिसतील.या चंदन नाल्याचे पाणी डोंगरातून वाहून येत असल्याने संपूर्ण नितळ असे असते,अभयारण्यातील बरेचसे प्राणी रात्रीच्या वेळी याठिकाणी पाणी पिण्यास येतात.पाण्यात बरेचसे गप्पी मासे आहे,खेकडे आहे....

आपण पुढे याच वाटेनं चालत गेलो की वनविभागाचा आदीपथ्याखाली येथे पक्षी,प्राणी,झाडे निरीक्षण करण्यासाठी साधारण वीस फूट उंचीचा मनोरा बांधला आहे.ज्यावर चढुन आपण अभयारण्याचे विलोभनीय दृश्य बघू शकतो,रात्रीच्यावेळी वनविभागाचे कर्मचारी या मनोर्याचा उपयोग अभयारण्य संरक्षणासाठी करतात...

यापुढे आपण त्याच पाऊलवाटेनं पुढे चालत गेलं की,आपल्याला बरेचसे चिंचोळे झरे पाहायला मिळतील. सूर्यकीरनात झऱ्यातील चमकणारे पाणी हे अभयारण्याचे सौदर्य अजूनच खुलवून टाकते.इथेही आपल्याला पाण्यातील विविध पानकोंबड्या, छोटूली मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकताना दिसतात, आणि नकळत आपण त्यांना कॅमेरात कैद करू लागतो...

पुढे हिरवाईने नटलेल्या रानात चालत गेले की काहीवेळाने आपण वाटेत लागणारं चढण चढून एका छोट्या तळ्याजवळ येतो. त्या तळ्यामध्ये खूप सुंदर अशी रानकमळाची फुलं आहेत,बाजूला असलेला संपूर्ण परिसर रानात आढळणाऱ्या रानफुलांनी सजलेला आहे.

इथे एक छोटीशी दर्गा आहे तिचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो की,आपल्याला अभयारण्यातील विविध झाडे,वेली दिसतात.ज्यामधे बहुतांश वनस्पती औषधी वनस्पती आहेत जसे की बांबू,पळस,रानपिंपळ,कडुनिंब,साग,करवंदाच्या जाळ्या,आवळा असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणकोंबडी,खेकडे,साप,आणि इतर पक्षी,जलचर प्राणी आहे सोबतच जसे कावळा,चिमणी,सुतारपक्षी,बगळा,बुलबुल,मोर,पोपट अन् काही अशी परदेशी पक्षीही या ठिकाणी या काळात स्थलांतर करतात जे इथे काही दिवस आपला मुक्काम करत असतात.


तळ्याशेजारी पुन्हा एक छोटा निरीक्षण मनोरा आहे,या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतोतेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे,धावडा,पिंपळ, पळस, करवंद,बोर,आवळा, सोबतच प्राणी,पक्षी पाहू शकतो.अभयारण्यात बिबट्या,लांडगे,चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर,मोर,रान डुक्कर यांसह इतर 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.यातील बरेचसे पक्षी प्राणी आपणी दिवसाही बघू शकतो.मनोऱ्यावरून दिसणारा हा नजारा डोळ्यांना एक सुंदर अनुभव देणारा ठरतो,हेच क्षण केमेर्यात कैद करायला मात्र विसराचे नाही हं...

पुढे याच ठिकाणी पुरातन काळातील राम,लक्ष्मण,सीता यांचे मंदिर आहे जे की उंच डोंगरात आहे,पुढे पुढे यांबद्दलही आपण जाणुन घेऊया.जसजसे आपण अभयारण्यात आत जातो आपल्याला तसतसे  विविध छोटेमोठे धबधबे लक्ष वेधून घेतात,यात मग धवलतीर्थ धबधबा,मगाशी बघितलेला चंदन नाला आणि असे बरेच जीवंत पाण्याचे झरे या ठिकाणी निरिक्षणास पडतात.

पुढे चालत गेलो की आपल्याला अभयारण्यातील सर्वात सुंदर विव्हपॉइंट बघायला भेटतो,जिथुन आपण गौताळा अभयारण्याचे बहुतांश सौदर्यरुप डोळ्यात साठवु शकतो.दुरदुर दिसणारा हिरवा सुंदर असा परिसर,अभयारण्याला लागून असलेली छोटीछोटी गावं,तिथील डोळ्यांना दिसणारी छोटुली झोपडीवजा घरे.

पुढे गेलो की अभयारण्याच्या हिरवाईत काळ्यापाषाण दगडात साकारलेली सितान्हाणी जीचा इतिहास भगवान रामचंद्र यांच्या काळातील गौताळा अभयारण्याची आपल्याला आठवण करून देतो.अन नकळत आपल्याला आपले मन त्या काळात घेऊन जाते,विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठ्याप्रमाणात असते...

उंच डोंगरात असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मग आपले पावले डोंगराकडे जाणाऱ्या पाऊला वाटेला लागतात.पावसाळ्यात सततच्या पावसामुळे निसरडी झालेली ही पाऊलवाट डोंगर चढतांना आपले कसब पणाला लावते.परंतु जेव्हा आपण ही वाट चढुन मंदीराजवळ पोहचतो तेव्हा डोळ्यांना दिसणारा नजारा बगून आपल्याला आलेला सर्व थकवा काही क्षणात नाहीसा होतो...

एरवी सूर्य अस्ताला जातांना दिसत असतो,मंदिराचे दर्शन घेऊन काहीवेळ तिथे असलेल्या कोरीव दगडांच्या जागेत बसून निसर्गाने निर्माण केलेल्या टाक्यातील थंडगार पाणी पिवून आपण तृप्त होवून जातो आणि आता आपण परतीच्या वाटेला लागलेलो असतो.पावलांना सावरत हळुवार आपण खाली आलो की सर्व परिसर पुन्हा एकदा आपण नजरेत सामावून घेतो....

आता मात्र परतीची जाणीव आपल्याला आपले मन करून देते अन् काहीशा जड अंतःकरणाने आपण हे सर्व अनुभवत परतीच्या वाटेला लागतो.रस्त्यानं दिसणारा सर्व सुंदर नजारा,अंगाला स्पर्शुन जाणारा वारा आतापर्यंत आलेला सर्व थकवा नाहीसा करतो.आपण परतीच्या वाटेला लागतो....

गौताळा अभयारण्य बघून झाले की,जवळपास अनेक स्थळं ही बघण्यासारखे आहेत.जसे की,अंतुरचा कील्ला,सातमाळ डोंगररांगा,अंबाडी प्रकल्प,कालीमठ कालिकामाता मंदिर,जगप्रसिद्ध पितळखोरा लेणी,भामासाद महाराज यांची अंधानेर येथील समाधी,रेल नावडी येथील भैरवनाथ मंदिर,उंच डोंगरावर असणारी शेकमारू बाबांची दर्गाह,पाटणादेवी,विविध ठिकाण हे बघण्यासारखे व आनंद,माहीती देणारे आहेत...

या ठिकाणांना भेट दिल्यावर औरंगाबादच्या जवळपास अनेक जगप्रसिद्ध ठीकाणंही बघण्यासारखे आहेत...
औरंगाबाद शहराची ओळखच ऐतिहासिक शहर असल्याने ते पुर्ण शहर बघण्यासारखे आहेच सोबत वेरूळ,अजिंठा लेणी,कैलास आश्रम,भद्रा मारुती मंदिर,थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ,देवगिरी किल्ला हे सर्व ठिकाण बघण्यासारखे आहे...

तेव्हा नक्कीच तुम्हीही लवकर भेट द्यायला या गौताळा अभयारण्य तुमचे स्वागत करत आहे....

लेखक -भारत लक्ष्मण सोनवणे.
कन्नड,औरंगाबाद.
संपर्क-9075315960.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...