एक साथी ऐसा भी था..,! भर मध्यरात्रीची ती वेळ रस्त्याच्या मधोमध भरधाव वेगाने चालणारी आमची ट्रक,दोन्ही बाजूने दूरदूर एकही गाडी नाही एखादी जवळून गेली की नकळत अंगाला थंडगार वाऱ्याच्या झुळकेतून येणारे काटे,कॅबिनमध्ये मध्यस्थी असलेल्या आरश्याच्या फितीत गुंतवलेला रातराणीच्या फुलांचा गजरा अन् हिंदी,उर्दू गझल प्रिय असलेला आवडता मित्र ड्रायव्हर.... हा प्रवास आयुष्यभर संपावा वाटणार नाही असा होता,मोजून संपूर्ण एक दिवस अन् दोन रात्रींचा हा प्रवास आजही जवळ जवळ चार वर्षांपूर्वीचा हा प्रवास मला आठवतो.तो फक्त या प्रवासात ऐकलेल्या गाण्यांमुळे असो किंवा त्या रातराणीच्या फुलांच्या गजर्यामुळे आजही तो सुगंध मी अनुभवतो त्या आठवणींमधून... रात्रीचा सोबतीला अधून मधून बरसणारा पाऊस झोप यायला लागली की,रस्त्याच्याकडेला ट्रक लावून वाफाळत्या चहाला रात्रीच्या कुठल्याही वेळेला अनुभवणे.वाफाळत्या चहाच्या वाफेत बघत ही रात्र मी जगत होतो,जी आजवर आता फक्त कल्पनेत जगत आलो आहे. आयुष्यात इतकी सुंदर रात्र तरी आजवर नाही जगलो... खूप लहान वयात खुप मोठ्या जबाबदाऱ्या मला माझ्या नशिबाने भेटत गेल्या त्यातीलच ही एक जबाब...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!