आठवणी अन् मित्र..!
काही मित्रांचं आपल्या आयुष्यात असणं आपल्याला आपल्या आयुष्याला अर्थ देणारं असतं.एक स्वप्न दोघांनी बघितलेले असावं,आपलं नाही पण त्याचं ते पूर्ण झालेलं असावं.आपलं का पूर्ण होवू शकत नाही..? किंवा आजवर का पूर्ण झालं नाही..? याला काही कारणे असतात अन् ती कारणेसुद्धा त्या आपल्या मित्राला माहीत असावी....
आपल्या या अश्या वाईट वेळेत जेव्हा तो आपल्याला प्रत्येक वाक्यागणिक समजावत असतो,एक आशेचा किरण दाखवत असतो अन् सर्वात महत्त्वाची आजवर जशी साथ देत आला तशी इथून पुढेही देईल हे नकळत बोलण्यातून सांगत असतोना तेव्हा खरच तो रक्ताच्या नात्यापेक्षाही जे नाते जवळचे असेल ते त्याचे अन् आपले असते.
आज अशीच खूप दिवसांनी त्याची भेट झाली अन् वरील प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय येत गेला.आजची सोनेरी किरणांची सांज,अधूनमधून बरसणाऱ्या पावसातही खूप सुंदर कधीही ही वेळ सरू नये अशी गेली....
Thank you Dost...!
After long time भेटूनही आपण यापूर्वी त्याच बालपणीच्या रोज होणाऱ्या भेटीसारखे रोज भेटत होतो असे वाटले....
रनिंगट्रेकवरती झालेली आपली आजची भेट आज पुन्हा आपल्याला त्याच वळणावर घेऊन आली अन् स्वप्न जेव्हा बघितले अन् काही दिवसांपूर्वी जेव्हा ते सत्यात उतरले तेव्हापासून आपली भेट नाही किंवा मी टाळत असेल पण नाही आज कितीही म्हंटले तरी आपल्यातले आपल्या मैत्रितले ते एक वर्तुळ पूर्ण झाले.मनात कुठेतरी एक वेगळीच रुखरुख लागून राहिली होती ती संपली,आता भेट होत राहील...
रनिंगट्रेकवरती दोघांची पावले वाक्यागानिक पडत होती,तू आदिसारखा हुड नाही राहिलास समजदार झालास याची प्रचिती येत गेली,जुन्या आठवणी कधी मी,कधी तू एकमेकांना सांगत होतो.सुखकर आयुष्याचे बघितलेले स्वप्न अन् आता ते सत्यात उतरल्यावर येणारे अनुभव तू सांगत होता मी ऐकत होतो,मी माझ्या जागी कितपत योग्य हे ही तू सांगत होता.बाकी आपल्या गप्पा या ठरलेल्या असतात त्याच काही ठराविक विषय सोडले तर फार आपले विषयसोडून बोलणे नाही...
एरवी रनिंगट्रेकवरती आपले पळणे कधी थांबेल असे आपल्याला वाटत राहायचं पण आज तुझ्यासोबत खूप दिवसांनी झालेल्या गप्पा आणि रनिंगट्रेकवरती आपले चालणे थांबुच नये असे वाटत होते.तुझ्यालेखी आपल्या आजच्या भेटीला किती महत्व होते मला माहित नाही पण माझ्यासाठी आजची भेट खूप काही देऊ करणारी होती,अजून खूप काही आहे पण ते नाही व्यक्त करता येत शब्दात...
Take care Dost...!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा