मुख्य सामग्रीवर वगळा

काळदरी एक अनोखं गाव..!

काळदरी एक अनोखं गाव..!

औरंगाबाद म्हंटले की आपल्याला नेहमीच औरंगाबाद शहर म्हणजे महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" किंवा "आॅटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" या दोन गोष्टीसाठी औरंगाबाद शहर डोळ्यासमोर येते...

एव्हाना ती या शहराची ओळखच,जी औरंगाबाद शहराच्या वैभवशाली इतिहासामुळे औरंगाबादास भेटली.एकीकडे औरंगाबाद शहरात औद्योगिक वसाहतींची नव्याने निर्मिती,शहरात विकासाच्या दृष्टीने येणारे रोजमितीला नव नवीन प्रकल्प,यामुळं औरंगाबाद शहराची "आॅटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही नव्याने होत चाललेली ओळख...

परंतु,या ही पुढे जावून औरंगाबाद शहराचा असो किंवा जिल्ह्याचा भौगलिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर विविध चकित करणाऱ्या गोष्टी आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यात बघायला मिळतात... 

                               

त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला एक वेगळी  भौगोलिक ओळख प्राप्त होते तर आजच्या या लेखात अशीच एक अनोखी अन् वेगळी ओळख मी तुम्हाला सांगणार आहे.जी पुन्हा एकदा औरंगाबादला वेगळं आणि उजवे ठरवते...

आपण महाराष्ट्राच्या भूगोलात बऱ्याचवेळा "काळदरी" नावाच्या गावाचा उल्लेख ऐकला,वाचला असेलच.हे गाव का इतकं महत्वपूर्ण आहे..? किंवा का या गावामुळे औरंगाबाद जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण होते..? ते यासाठी की औरंगाबाद जिल्ह्याचे 'कोकण' म्हणून या गावाच्या परिसराला ओळखले 
जाते.कारण कोकणाप्रमाणे इथेही काही अंशी भाताची शेती केली जाते...

जाणून घेऊया औरंगाबाद जिल्ह्यातील ' सोयगाव ' तालुक्यातील काळदरी,वेताळवाडी या दोन्ही गावांची भौगोलिक स्थिती.
सोयगाव तालुक्यातील काळदरी,वेताळवाडी हे दोन्ही तांडे अजिंठ्याच्या डोंगरकुशीत साधारणपणे पूर्ण वसले आहेत.दोन्ही तांड्यांच्या तिन्ही बाजूंनी उंच अशी डोंगरे अन् यांच्या मधोमध असलेले काळदरी,वेताळवाडी हे दोन्ही तांडे आहेत. लागून उंच उंच डोंगर असल्यामुळे कधीही डोंगराची दरड कोसळण्याची भिती असते,पावसाळ्यात ही भिती जास्तीची असते.सोबतच डोंगरात असलेलं घनदाट जंगल आणि डोंगराच्या उतराने पावसाळ्यात तिन्ही बाजूंनी येणारं पाणी,यामुळे पावसाळ्यात पुर येण्याचा धोका खूप असतो,सुदैवाने आजपर्यंत येथे दुर्घटना घडली नाही...

मात्र,अजिंठ्याच्या घाटात अधूनमधून दरड कोसळत असते,सोयगाव पासून ६० किलोमीटरवर काळदरीचा हा सोयगाव व कन्नडच्या सीमेवर वसलेला निसर्गरम्य परिसर आहे... 

'काळदरी' नावाप्रमाणेच या गावात प्रकाशापेक्षा अंधार जास्त वेळ असतो आणि याच गावाची एक खासियत,वेगळेपण आहे जे या गावात गेले की आपल्याला अनुभवयाला भेटते.ही काळदरी तिन्ही बाजूंनी भल्यामोठ्या डोंगराने वेढली आहे,पूर्व,पश्चिम व दक्षिण बाजूंनी डोंगर व हवा येण्यास उत्तर बाजूचे मोकळे रान.काळदरी गावात सूर्योदय होतो सकाळी ८ वाजता आणि सूर्यास्त होतो संध्याकाळी ४ दरम्यान,हेच या गावाचं वेगळपण आणि यामुळे येथील दैनंदीन जीवनसुद्धा हळुवार अन् वेगळे आहे...

काळदरी गावाबद्दल काही विशेष माहिती...

गावातील लोकसंख्या: एकूण १८९ पुरुष:१०३ , स्त्रिया:८७.
एकूण कुटुंब:३४.
काळदरी पासून सोयगाव तालुक्याचे अंतर: ७५ किमी.
काळदरी पासून जिल्ह्याचे अंतर: १४० किमी.
काळदरी गावचे क्षेत्रफळ: ७२६.०० हेक्टर.
काळदरी गावाला: महामार्ग,जिल्हामार्ग,राज्यमार्ग नाहीये.
बँक नाही,पोस्ट ऑफिस नाही,पिनकोड नाही,दळणवळण करण्यासाठी एसटी बसची सोय नाही.
दैनिक बाजार नाही,आठवडे बाजार नाही.
सर्वात महत्त्वाचे गावात वाचनालय नाही,वर्तमान पत्र नाही.
कुठल्याही सुख सोयी नसलेले हे गाव जगापासून अलिप्त आहे,आठ तास दिवस अन् सोळा तास रात्र असलेलं हे वेगळेपण दर्शवणारे गाव...
(काळदरी गाव जसे या जगापासून विलुप्त असल्यासारखे आहे,त्याचप्रमाणे या गावाची माहितीही अशीच विलुप्त प्रकारात मोडते.
त्यामुळे बरेच लेख वाचून,इंटरनेट माध्यमातून माहिती मिळवून या गावाची ही भौगोलिक स्थिती आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे...)

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...