मुख्य सामग्रीवर वगळा

#LionelMessi..❤️

#LionelMessi...❤️

फुटबॉल म्हंटले की माझ्यासह जगातील असंख्य चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनलेला लिओनेल मेस्सी हा खेळाडू आठवतो,फुटबॉल म्हंटले की आपसूकच फुटबॉल=मेस्सी हे समीकरण जुळून येते.
गेल्या आठवड्यात फुटबॉल विश्वात मेस्सीसोबत काही घडामोडी घडल्या,ज्या खुद्द मेस्सीलासुद्धा लवकर कळून चुकल्या नाही...

जेव्हा हे त्याला कळले तेव्हा अवघ्या जगातील मेस्सीचा चाहता वर्ग हळहळला,सोबत मेस्सीही.कारण बार्सिलोनाकडून खेळताना आपला त्यांच्यासाठी खेळण्याचा असा शेवट होईल हे त्यालाही वाटले नव्हते,की त्याच्या चाहत्या वर्गालासुद्धा,परंतु हे सर्वकाही गेले काही दिवसात घडून आले...

अर्जेंटीनाचा स्टार फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पेनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाला काही दिवसांपूर्वी अलविदा केले आहे.मेस्सीने १७ वर्ष खेळत असलेला बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय ज्या क्षणी घेतला त्यावेळी मेस्सीसह अवघे फुटबॉल विश्व हळहळले.कारण संपूर्ण १७ वर्ष बार्सिलोना टीमसाठी त्याने दिलेलं योगदान,असंख्य बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या चाहत्या वर्गाचा गळ्यातले ताईत बनलेला मेस्सी होता.मेस्सीच्या क्लबसोबत शेवटच्या पत्रकार परिषदेत बोलताना मेस्सीला अश्रू अनावर झाले अन् तो ढसाढसा रडला...

३४ वर्षींय फुटबॉलपटू मेस्सीने १७ वर्षांत ३५ पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. तर बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने ७७८ सामन्यात ६७२ गोल केले आहेत.पाच वेळा ‘फीफा प्लेअर ऑफ द इअर’ ही मेस्सीला मिळालं आहे.मेस्सीचा बार्सिलोना क्लबसाेबत २०१७ साली ५ हजार ४०० कोटींचा करार करण्यात आला होता आणि तो ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता,सध्याच्या जगातील असलेल्या या वाईट परिस्थितीचा फटका फुटबॉल विश्वालासुद्धा बसलेला आहे,जेव्हा मेस्सी पत्रकार परिषदेत बोलायला आला,तेव्हा बार्सिलोनाबरोबर जिंकलेल्या त्याच्या ट्रॉफीजही तिथे ठेवल्या होत्या...

तो म्हणाला, ''क्लबसोबत चांगला आणि वाईट दोन्ही काळ पाहिला.पण लोकांचे प्रेम कायम राहिले.मला आशा आहे,की मी परत येईन आणि या क्लबचा एक भाग होऊ शकेन.या क्लबला जगातील सर्वोत्तम क्लब बनवण्यासाठी मी काहीही करू शकतो.पण सध्या माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत.मी माझे मानधन ५० टक्क्यांनी कमी करण्याची ऑफर क्लबला दिली होती,परंतु ही अट बार्सिलोना संघाच्या व्यवस्थापकांना योग्य वाटली नाही अन् मला या निर्णायक क्षणांना सामोरे जावे लागले पण यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही...

मेस्सी ज्या क्लबमध्ये सामील झाला आहे त्या क्लबकडून त्याला वर्षाला २५७ कोटी मिळणार असल्याची माहिती समजत आहे.पॅरीस सेंट जर्मनसोबत मेस्सीचा करार झाला असून तो आता या क्लबसाठी खेळणार आहे.या क्लबमध्ये मेस्सीचा जुना मित्र नेयमार ज्युनियर आणि फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एमबापे हे सुद्धा आहेत...

काही खेळ अन् काही खेळाडू अन् त्यांचा चाहतावर्ग हे नातं कायम आठवणीत राहील असे असते.याचे जिवंत उदाहरण आपल्याला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या क्रिकेट विश्वातील निवृत्ती नंतर अवघ्या विश्वात बघायला मिळाले.जेव्हा टेनिस विश्वात रॉजर फेडरर बरोबर काही घडत असते,तेव्हा त्या बातम्यांवर लक्ष ठेवून असणारा त्याचा अवघ्या विश्वातील चाहता वर्ग,मेस्सीच्या बाबतीत क्लब सोडतांना मेस्सी फुटबॉल कायम सोडणार की काय..? हा त्याच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आणि पॅरिस सेंट जर्मनच्या टीमसोबत मी पुन्हा फुटबॉल खेळताना तुम्हाला दिसेल हे जेव्हा मेस्सी त्याच्या चाहता वर्गाला सांगतो तेव्हा सुटकेचा निःश्वास घेताना त्याचे चाहते अन् एकीकडे बार्सिलोना फुटबॉल क्लब सोडल्यानंतर बार्सिलोना फुटबॉल क्लबचे चाहते यांना अनावर झालेले अश्रू...
खरच मेस्सी ग्रेट आहे...❤️

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...