मुख्य सामग्रीवर वगळा

Amazing Aurangabad..!

Amazing Aurangabad..!


#aurangabad 

शहराची नव्यानं होणारी ओळख अन् शहराचे वाटणारे आकर्षण,गेले काही वर्ष हा माझा नियमित आवडणारा विषय मग ते शहर कुठलेही असो. प्रत्येकवेळी एका नव्या नजरेतून शहर बघायला मला नेहमीच आवडते का माहित नाही औरंगाबाद शहर गेली कित्येक वर्ष बघत असुनही अजूनही मला ते मी पूर्ण बघितल्याची जाणीव माझ्या मनात निर्माण होत नाही...

ती जाणीव अपूर्ण का आहे..?

हे जवळ -जवळ प्रत्येक औरंगाबादकर आपल्याला सांगेल,एकीकडे रोज नव्याने वाढणारे हे शहर आणि एकीकडे साधारण काही वर्षांपूर्वी लहान बाळाप्रमाणे बाळसे धरणारे हे शहर यात खूप फरक आहे.

आज चहूबाजूंनी औरंगाबाद शहर झपाट्याने वाढत आहे,तसे या शहराचा विकास माझ्या मते तरी १९९६-९७  सालापासून सुरु झाला असेल.कारण मला जसे कळू लागले तसे या शहरात माझे येणे जाणे आहे तसे औरंगाबाद शहराचा व्याप अन् विकासाचा आलेख नेहमीच वाढता आहे,साहजिक आहे या आधुनिक युगात कुठल्या शहराचा व्याप वाढणार नाही.पण हा व्याप वाढूनही एक भावनिक बंध जो असतो जसा मुंबईकरांचा मुंबईशी आहे,पुणेकरांचा पुणेशी आहे अन् त्यानंतर मला दुसरे नाव सुचतच नाही Absolutely औरंगाबादकर आणि औरंगाबाद औरंगाबादकर म्हणण्यात जी फिलिंग आहेना ती काही औरच....

तुम्ही म्हणाल भावनिक बंध कसे आहे तुझे औरंगाबादशी..? कारण तू फार काळ तिथे नसतो आणि तरीही तुला इतके जवळचे का वाटते औरंगाबाद..?

भावनिक बंध यासाठी आहे की या शहराशी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी नाळ जन्म झाल्यापासून जुळली आहे अन् ती आजतागायत कायम.विमानतळ जेव्हा इतक्या जवळून बघितले,तेव्हा अनेकदा वाटायचं उतरते विमान उतरत्यावेळी कसे दिसत असेल..? त्यावेळी विमानतळवर वातावरण कसे राहत असेल..? आणि असे अनेक प्रश्न असायचे...

त्यामुळे विमानतळवर असलेल्या गेटपाशी असलेल्या चौथऱ्यावर बसून आम्ही तासनतास त्याची वाट बघत बसायचो,कित्येकदा ते पूर्णपणे दिसणार नाही माहित असूनही ते बघणं आणि ते कुतूहल आजही कायम आहे.आजही जेव्हा अवघ्या शहरावरून येणारं विमान दिसलं की,आपसूक काही क्षण ते नजरेआड जाइस्तोवर मी बघत असतो.शेंद्रा औद्योगिक वसाहतीत हवेत दिसणारे विमान बघून मला खाली नव्याने उभी होत असणारी शेंद्रा औद्योगिक वसाहत कल्पनेतच माझ्या डोळ्यांना विमानातून दिसत असते....

शहरातील वातावरण असो किंवा तेथील नागरिक प्रत्येकजण खूप जवळचा आपलासा वाटणारा मला भासत असतो.अजून एक जिव्हाळ्याचा विषय माझ्यासाठी या शहराशी आहे तो म्हणजे शहराच्या आजूबाजूने शहराच्या विकासात प्रामुख्याने येणाऱ्या विविध कंपन्याशी.जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा मी या औद्योगिक वसाहतीमध्ये पायी फिरत,प्रत्येक कंपनीतील घडघड धडधड जवळून ऐकत असतो. जवळजवळ संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्या मी बघितल्या आहे,कुठे काय काम चालते हे सर्व मला बऱ्यापैकी माहित आहे.काही दिवस येथे काम केले असल्याने अगदीच खूप जवळचे वाटते हे सर्व...

अश्या अनेक बाबी आहे ज्या या शहराशी मला जुळवून ठेवतात...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...