आठवणींचा गुलमोहर..!
भूतकाळात मन रमायला लागलं की आपसूकच आठवणींचा पसारा वाढत जातो.जसा गुलमोहर त्या फुलांच्या बहरातून निखळून जमिनीवर चहूकडे पसरला जातो,अगदीच तसचं आठवणींचे असते.त्यांनाही गुलमोहराच्या फुलांप्रमाणे सुगंध असतो,पिवळसर तांबूस त्या फुलांना असलेलं पुंकेसर कदाचितच कुणी या गुलमोहराच्या फुलाचे बघितले असेल,हो कदाचितच.कारण गुलमोहर हा अनेकांना फक्त हिरवा असेस्तोवर अनुभवयाला,बघायला आवडतो....
कधीतरी त्या भर उन्हाच्या झळांना सोसताना बघावं,उन्हाच्या वाहत्या झळा आणि आपल्या अस्तित्वाच्या शेवटच्या खुणा मोजणारे ते गुलमोहराचे फुलं,आपलं बहरणे सोडून जेव्हा ते अस्तित्वाच्या शेवटच्या खुणा मोजत असते तेव्हा त्या गुलमोहराच्या सर्वांगावर त्या पिवळसर,तांबूस फुलांची आरास चादर बनून झाडाला सोखावत असते काही घटकांसाठी....
पानगळ सुरू झाली की,सुरू होतो या फुलांचा वाहण्याचा हा प्रवास,सोबतीला असतो आपल्याला त्या वाळलेल्या फुलांचा हवाहवासा सुगंध आणि सोबतच एखादी सर पावसाची यावेळी येऊन जावी हीच एक कोरडी पडलेली अपेक्षा...
आठवणींच काही वेगळं नसतं फरक इतकाच की,त्यांना न कधी पानगळ सोसण्याची भिती असते किंवा कधीतरी आपल्या हिरवाईतून कुणाला आपलेसे करावे वाटणारा असा ध्यास...
आठवणींच जग वेगळंच असतं,त्या वाहत्या गुलमोहराच्या फुलाप्रमाणे,कधीतरी खूप काही देऊन जाणारं.कधी आपल्या शेवटच्या काळात वाहत्या गुलमोहराच्या फुलाप्रमाणे खूप काही मागे सोडून गेलेलं ते पिवळसर तांबूस पुंकेसर जसे...
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा