सैर पर्यटनाची माझ्या सोबत..!
लेख क्रमांक:२.
मागील लेखमध्ये मी तुम्हाला कन्नड,सोयगाव,चाळीसगाव,सिल्लोड या तालुक्यातील लेणी,किल्ले,धबधबे,अन् काही पुरातन मंदिरे यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला.आता नेमके या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर ती कशी व कुठून सुरुवात करायची ही मी माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
ही भ्रमंती करतांना आपल्याला चाळीसगाव तालुक्यात फार असे फिरावे लागत नाही,एक पाटण्या देवीचे पुरातन मंदिर सोडले तर आपल्याला फारसे त्या भागात जाण्याची आवश्यकता नाही.परंतु तुम्हाला फक्त चाळीसगाव तालुक्यातील अश्या स्थळांची भेट घ्यायची तर मात्र मग नक्कीच चाळीसगाव तालुक्याची भ्रमंती करा,कारण येथेही बऱ्यापैकी खूपकाही बघण्यासारखे आहे...
तर चला आता आपण सुरुवात करुया अजिंठा डोंगररांगा,गौताळा अभयारण्य,औट्रम घाट आणि सातमाळ डोंगररांगेतील भ्रमंतीसाठी.
सर्वप्रथम आपण सुरुवात करुया ती चाळीसगाव लगोलग असलेल्या पाटणादेवी येथून.येथील पुरातन पाटणादेवी मंदिराचे दर्शन घेतलं की आपण डोंगरांगेतून पायवाटेने साधारण ४-५ किमी चालले की पितळखोरा येऊ शकतो.पाटणादेवी जवळच आपल्याला कान्हेरगड बघायला मिळतो याच परिसरात पुरातन काळातील शिवमंदिर आहे,पाटणादेवी आणि पितळखोरा यामध्ये असलेल्या डोंगराच्या एक बाजूस चिंध्यादेवाचा डोंगर असे म्हंटले जाते तर दुसऱ्या बाजूस गायमुखचा डोंगर असे म्हंटले जाते.
आपल्याकडे गाड्या असेल तर मात्र आपल्याला चाळीसगाव महामार्ग (एन-एज २११) औट्रमघाटने कन्नड तालुक्यात येऊन कालिकामातेचे मंदिर असलेल्या कालिमट मार्गाने पितळखोरा लेणीकडे यावे लागेल.कालिकामातेचे कालिमाट मंदिरसुद्धा खूप महत्वपूर्ण आणि अनेक मंदिराच्या विशेष कामांच्या नमुण्यांसाठी प्रसिद्ध आहे...
याच मार्ग पुढे ८ कि.मी गेले की आपल्याला पितळखोरा लेणी बघायला भेटते.जगातील सर्वाधिक जुनी लेणी म्हणून या लेणीला ओळखले जाते,या लेणीबद्दल मी अनेक अभ्यासपर लेख यापूर्वी ब्लॉग माध्यमातून दिलेले आहे.लेणी अभ्यासकांनी नक्कीच या लेणीला भेट द्यायला हवी अशी ही लेणी आहे,या परिसराबद्दल अजून महत्वपूर्ण घटना नोंदवली गेली आहे की भारतीय गणित तज्ञ यांचा जन्म या ठिकाणी झाला आहे,शून्याचा शोधही या ठिकाणी लागला आहे.
परंतु आजही ही माहिती बऱ्यापैकी जगापासून विलुप्त असलेल्या प्रकारात मोडते...
याच मार्ग आपण आपण लेणी बघून आलात की,आपल्याला सुरपळा डोंगररांगेचे दर्शन होते.साहसी ट्रेकरसाठी ही डोंगररांग खूप छान आहे,निसर्ग सौंदर्याने नटलेले ही डोंगरांग ट्रेकिंगसाठी कन्नड वासियांच्या पसंतीस उतरते.कन्नड शहराची मूळ ओळखच आहे की टेकड्या अन् डोंगर रांगानी वेढलेले शहर,कारण कन्नड शहराच्या जवळपास चहूबाजूंनी टेकड्या अन् डोंगरांगा आहेत.
कन्नड शहर परिसरात येतांना आपण "अंबाडी प्रकल्प"सुद्धा बघू शकतो,अंधानेर येथे असलेलं पुरातन काळातील "संगमेश्वर मंदिर" आपण बघू शकतो,ज्याचे आता नव्याने डागडूजीकरन झाले आहे.कन्नड शहराजवळ अजून एक महत्वपूर्ण गाव आहे ज्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहले जाते,ते म्हणजे "मक्रणपुर" कारण "जय भीम" हा नारा (घोषणा) हा सर्वप्रथम कुठे देण्यात आला तर तो या मक्रणपुर गावात.अजुन जवळच "रेल" येथे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले "भैरवनाथ मंदिर" या रेल गावी आहे...
क्रमशः
Written by,
©®Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा