भोकाड वस्ती जगण्याला आधार..!
भोकाड वस्ती जगण्याला आधार झाल्या अन् त्यांच्याबद्दल आपसूकच मनात आपलेपणाचा भाव निर्माण झाला.
आयुष्यात का..? कश्याला..? या गोष्टींना कधीच महत्त्व नव्हतं.
जिथे,ज्या गोष्टींच्या सानिध्यात मला आपलेपण,आपुलकी वाटत होती तिथे माझे सुत जुळले. बाकी क्षणभरचा विसावा देणाऱ्या वस्ती असो किंवा माणसे आयुष्यात खूप आली,गेली त्यांनी,त्यांच्याशी माझं जपून ठेवलेलं आपलेपण कायम आहे.
भोकाड वस्ती अनेकांना नकोशी वाटते पण मला माझ्यातला मी तिथं नव्यानं भेटत असतो.आयुष्यात काय हवं आहे,काय नको आहे हे प्रश्न जेव्हा सुटत नाही त्यावेळी आपसूकच पावलं इकडे वळतात अन् काहीतरी निर्णय घ्यायला मी समर्थ ठरतो...
निर्णय कितपत योग्य ठरणार आहे किंवा कितपत योग्य आहे,याला उत्तरंही नाही अन् त्याचा विचारही नाही...
भोकाड वस्तीत काळाबरोबर राहिलेली माणसे कायम सोबत असतात,त्यांचे आयुष्यातील अनुभव अन् जगण्याची रीत मला आयुष्यात जगायला शिकवते...
फार काही हाती लागणार नाहीये माहीत असूनही,मी कधी विचार केला नाही की आपला फायदा कितपत आहे.आयुष्याची काही गणितं आपण सोडवायची नसतात,वेळेनुसार ती आपोआप सुटतात फक्त आपण कारण ठरत असतो,जसं थोरोला त्याचं आयुष्य जगण्याचे सूत्र कळले तसे आपल्याला सुद्धा कळेल...
परंतु फक्त कळून चुकनार नाहीये,आयुष्यात त्या कळण्याप्रमाणे आपण कितीपत Move on करतो हे महत्त्वाचे ठरते...
आता नेमकी तीच वेळ आहे की,आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टीत आपल्याला सुख मिळत आहे अन् ते कळूनही आपण ते नाकारत फक्त आयुष्य जगायला काही गोष्टींची आवश्यकता असते म्हणून आपण त्या गोष्टीमागे धावत असतो हे विचार करायला लावणारं आहे.
अन् अन् मग इथेच सर्व गफलत होवून बसते मग आयुष्यभर न जगण्याचं गणित जुळते ना आपलं आयुष्य आपल्यासाठी जगण्याचे गणित जुळते...
असो काही गोष्टी हातच्या नसतील इतपत खरं आहे,पण काही हातचे असूनही आपण नाही करू शकत हेही तितकच खरं आहे..!
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा