मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची माझ्या सोबत भाग - ३.

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..!
भाग - तीन.

मागील भागात आपण कन्नड शहर आणि जवळपास असलेल्या छोट्या काही गावांची माहिती घेतली.सोबतच जगप्रसिद्ध पितलखोरा लेणी,पाटणादेवी मंदिर अन् जवळ असलेल्या डोंगररांगांची माहित घेतली.आता या भागात आपण सोयगाव,सिल्लोड तालुक्यातील काही लेणी,किल्ले अन् मंदिरांची माहिती घेणार आहोत.ही सर्व भ्रमंती करतांना आपल्याला हे सर्व स्थान कसे बघायचे,याची माहिती या लेखाच्या माध्यमातून मी देणार आहे...

कन्नड वरून गौताळा अभयारण्यात गेले की,गौताळा अभयारण्य बघितल्यावर आपल्याला याच परिसरात असलेला अन् आपण बघत असलेल्या स्थानपैकी दुसरा किल्ला बघायला भेटतो.
जो किल्ला कन्नडसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे,कन्नड शहरातील पर्यटन स्थळांची भेट घेत असताना प्रथमस्थानी हा किल्ला आहे.ज्याचे नाव "किल्ले अंतुर" असे आहे किल्ले अंतुर विषयी माझ्या ब्लॉगमध्ये सविस्तर लेखन केले असल्यामुळे येथे फार असे लिहणार नाही...
"किल्ले अंतुर" बघून आपण जेव्हा आपण भटकंती करत त्या परिसरात फिरत असतो,त्यावेळी आपल्याला या ठिकाणी "कोकणी आदिवासी" लोकांची वस्ती बघायला भेटते.ज्यांच्याकडून आपण येथील परिसर अन् त्यांचे जीवन याबद्दल सविस्तर माहिती घेऊन त्यांचे जीवन जवळून अनुभवू शकतो.
पुढे गेले की जवळच "काळदरी व्ही व्हेली" आहे. जीच्याबद्दल मी काही दिवसांपूर्वी एका लेखमध्ये सविस्तर लेखन केले आहे."काळदरी" या छोट्याशा गावाची भौगोलिक स्थिती अन् तेथील लोकांची दिनचर्या हे भौगोलिकस्थानांचे अभ्यास करण्यासाठी खूप अभ्यासपूर्ण असे गाव आहे.अनेक सोयींपासून वंचित असलेलं हे गाव जगापासून वेगळे झाल्यासारखे भासणारे आहे.तेथील लोकांचा दिवस हा सकाळी साधारण ८-१० दरम्यान उगवतो आणि साधारण ४वाजता मावळतो,हे सर्व तेथे राहून पर्यटकांना अनुभवता येईल...
"किल्ले अंतुर"जवळ काही अंतरावर आपल्या भ्रमंतीमधील तिसरा किल्ला म्हणजेच "लोंजा किल्ला" हा आहे.येथून पुढे गेले की आपल्याला पुरातन काळातील जोगेश्वरी देवींचे मंदिर बघायला भेटते.याच ठिकाणी लेण्या कोरण्याचा प्रयोग झालेला आपल्याला काही अंशी दिसून येतो .
पितळखोरा लेणी बघून झाली की आपल्याला नंतर बघायला भेटणारी दुसरी लेणी म्हणजे "कान्हेरगड" येथील "जैन लेणी" आहे जी सुद्धा बघण्यासारखी आहे लेणी अभ्यासकांनी आवर्जून भेट द्यावी या ठिकाणी असे ठिकाण हे आहे.पुढे नागद गावाजवळ गेले की आपल्याला "गोलटाक्या"म्हणून ठिकाण आहे ते बघायला मिळते याठिकाणीसुद्धा काही अंशी लेणी कोरण्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात...
याच मार्गाने आपण पुढे गेलो आपल्याला "बनोटी" जवळ "धारेश्र्वर लेण्या" बघायला मिळतात.यालाच "धारकुंड" किंवा "धारेश्वर लेण्या" असे म्हणतात.याच ठिकाणी पुढे गेले की आपल्याला "धारेश्र्वर धबधबा" बघायला मिळतो. मागील लेखात सांगितल्या प्रमाणे "धवलतिर्थ धबधबा" आणि "केदार्या धबधबा" हे दोन मोठाले धबधबे पाटणादेवी जवळ आहे.
"धारेश्र्वर धबधबा" बघून झाला की जवळच "वाडी सुतांडा" हा किल्ला आहे.येथे जवळपास ५२ पाण्याचे टाके आहे खूप सुंदर पद्धतीने याठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन केलेलं आपल्याला बघायला भेटते...
या मार्गाने आपण सतत पुढे गेलो की आपल्याला "घटोत्कच लेण्या" बघण्यास मिळतात जवळच अजून एक प्रसिद्ध किल्ला म्हणजेच "जंजाळ किल्ला" आहे.समोरच "वेताळवाडी" धरणाचा प्रचंड मोठा जलसाठा आहे,त्या बाजूलाच "वेताळवाडी किल्ला" आहे.ज्यास कुणी "हळद्या किल्ला" म्हणता तर कुणी "ढाकल्या किल्ला" असेही म्हणतात.यामुळेच या गावालाही "वेताळवाडी" असे नाव पडले आहे,सोबतच हळदा,ढाकला ही सुद्धा गावे जवळच्या परिसरात आहेत.जी फर्दापूर जवळ येतात.सोयगाव तालुक्यात हे सर्व ठिकाण येतात....

हे सर्व बघून झाले की डोळ्यांचे पारणे फेडणारे "गौताळा अभयारण्य" अन् तेथील सर्व ठिकाणे आवर्जून आपण बघायला हवे आहे..गौताळा अभयारण्य विषयी मी खूप मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे,गौताळा अभयारण्य विषयी आपणास माहिती हवी असेल तर माझे जुने लेख किंवा ब्लॉगला एकदा भेट द्या....
वरील माहिती संकलत करण्यासाठी मी स्वतः यातील बऱ्याच ठिकाणांना भेट दिली आहे.सोबतच प्रा.सूर्यवंशी सरांची विविध लेख,उपलब्ध व्हिडिओ माध्यमांतून मी ही माहिती मिळवली आहे.कन्नड तालुक्याचा इतिहास असो किंवा भौगोलिक माहिती,कन्नड आणि जवळपास असलेल्या तालुक्यातील आदिवासी,ठाकर,भिल्ल बांधवाचे जीवन सरांनी खूप जवळुन अनुभवले,बघितले आहे त्यांच्या जीवनावर बराच अभ्यास सरांनी केला आहे त्यामुळे या लेखांमध्ये सरांची बरीच मदत मला माहितीरुपाने झाली आहे....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...