बहाणे..!
बंद खिडकीच्या अलिकडे असलेल्या जगास
काय मी बोलतो काय सांगायचे,
बहाणे ते रोजचे तिच्याशी बोलायचे मनास आता किती
वेळ मी माझ्या समजावयाचे...
बहाणे करून बोलणे,नजरेला लपवत खिडकीआड
असे किती आता बघायचे,
डोळ्यांनी नजरेला सावरत कितीवेळ आता तुझ्या
डोळ्यांना फक्त नजरेनीच अनुभवायचे...
कितीवेळ असावे नियंत्रण माझे आता श्वासावर
असे कितीसे फक्त क्षणभरच्या प्रेम लहरींवर जगायचे,
नजर रोखून अशी रोज मला प्रश्न करते,
का रे मना असे किती दिवस तुझे हे छुपे प्रेम चालायचे...
किती दिवस फक्त असे खिडकी आडूनच
मी फक्त तुला न्याहाळयचे,
कल्पनेतच तुझ्यासंग असे कितिदिवस,
तुझ्या प्रेमात अजून मी वाहायचे...!
Written by,
Bharat sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा