एक आगळी वेगळी आवड..!
अगदी नकळत्या वयात आपल्याला ज्या गोष्टीचं कुतूहल वाटायला लागतं पुढे तोच विषय आपला आवडीचा होवून जातो अन् नकळत आपण त्या विषयाशी जोडून असलेली माहिती,आपले निरीक्षण करणे वाढवत असतो...
मग नेमकं कुतूहल वाटणे म्हणजे काय तर त्या विषयात आपल्याला रुची असणं,त्याबद्दल आपल्याला आधिकाआधीक जाणून घ्यायला नेहमीच आवडणं,मलाही अश्याच एका गोष्टीच्या बाबतीत खूप लहानपणापासून कुतूहल आहे.शक्यतो या गोष्टीचा फार विचार कुणी करत नाही,जरी केलाच तर ते फक्त वडीलधारी माणसेच करतात.माझ्या वयाच्या तरुण पिढीला क्वचितच हा विषय जवळचा वाटतो,कारण तो काही विशेष नाही किंवा आपल्या रोजच्या जीवनात त्याचा आपल्याला काही उपयोग आहे,असतो असेही नाही...
परंतु मी वर जसे म्हंटले की,अगदी नकळत्या वयात आपल्याला ज्या गोष्टीचं कुतूहल वाटायला लागतं पुढे तोच विषय आपला आवडीचा होवून जातो,बस अगदी माझा बाबतीत हेच आहे...
विषय जरा आगळा-वेगळा आहे अन् बऱ्याच जणांना तो आवडतही नसेल,मला ते सर्व न्याहळण्याची आवड कदाचित पिढीदर पिढी संस्कार म्हणून जे घरातील व्यक्ती आपल्याला त्या कामात मदत अन् पुढची पिढीसुद्धा या सर्व गोष्टींना शिकावी म्हणून त्यात आमचा सहभाग नोंदवण्यासाठी सांगते म्हणून त्याबद्दल आधिकच जाणून घ्यायला आवडत असेल,आवड निर्माण झाली असेल ती आजवर तरी मला योग्य वाटली कारण उद्या आपल्या पिढीला हे सर्व करायचे आहे...
मला अंतिमसंस्कार करत असताना तो कश्या प्रकारे केला जातो त्यासाठी कोणते विधी त्या एका दिवसात केले जातात हे सर्व बघण्याचे फार कुतूहल आहे.जरी प्रत्येक ठिकाणी ते सारखेच केले जात असतील,मला नेहमीच काहीतरी नवीन माहिती भेटण्याची इच्छा असते.त्यामुळे अश्यावेळी माझी निरीक्षण करण्याची वेळ असते,कदाचित जवळचे कुणी सोडून गेले असेल तर मग प्रत्यक्ष सहभाग नोंदवणे मग त्या सर्व विधी आपण स्वतः सहभाग नोंदवून करणे असो...
वर सांगितल्याप्रमाणे जवळचे नातेवाईक नेहमीच या विधीत आमच्यासारख्या तरुण मुलांना सहज सामील करून घेत असतात.हेतू एकच आज जे ते करता आहेत,उद्या तेच आजची तरुण पिढी करेल.म्हणजे हे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिल्या जातील,आजकालच्या आधुनिक युगात हे कित्येकांना योग्य वाटणार नाही...
गावाकडे गावपण जपताना हे सर्व आजही जपल्या जातं,घरात मोठ्या भावानंतर कर्ता असल्यामुळे भावाची कामानिमित्त बऱ्याचवेळा उपस्थिती नसली की या सर्व विधिसाठी मी जात असतो.त्यामुळे इतरांना एक वेगळी वाटणारी भिती असो किंवा नकोसे वाटणारे हे कार्य मला कधीच नकोसे झाले नाही.
याउलट शेवटच्या वेळी आपण त्या व्यक्तीची सेवा केली,याचं एक वेगळं समाधान भेटत असते....
मी शहराला असतो मग असं जवळचे कुणी वारले की लगेच जावून तिथं मदत करणे शक्य नसते.अश्यावेळी मी अंतिमविधीच्या घटकेभर आदी जावून जी मदत होईल ती मी करत असतो.ज्यात एक आनंद भेटतो,जरी मनास अपार दुःख झालेलं असते.
मग ते अंतिम विधीसाठी गावच्या शेतातून सरपण घेऊन जाणं असो,बोळवणीचे शक्य होईल ते सामान आणण्यासाठी एक वडीलधाऱ्या माणसाला घेऊन सोबत जाणं,त्यावेळी काय लागते हे सर्व निरक्षण करणं,ते लक्षात ठेवणं.चांदीचा तार काडीत तो कसा ओवायचा अन् कसा तिर्डीला बांधायचा हे बघणं ते करणं.गावाकडे रेडिमेड स्टीलची तिरडी फार कमी वेळा भेटते,मग वेताची ती करून घेणं ती एका विशिष्ठ प्रकारे करतात मग ती कशी हे सर्व बघणं, ते सर्व जाणकार व्यक्तीला घेऊन आपण तरुण मुलांनी करणं,सहभाग घेणं.
पुढे खूप छोट्या छोट्या गोष्टी त्या लक्ष देऊन करणं काही चुकत असेल ते सांगणं,हे सर्व होत असतं.यात काय विशेष अन् एका दिवसासाठी इतकं कोण लक्ष देईल असे बरेच जण म्हणतात,मला हे कधीच योग्य वाटले नाही मी सर्व बघत असतो,करत असतो....
अंतिम विधीसाठी आणेलेले सरपन योग्यरित्या रचणे हे खूप महत्वाचं अन् जिक्रीचे काम हल्ली आम्ही योग्य करायला लागलोय,ते झाले की इतर विधी पार पडत असताना ते कसे होतात.मग मृत व्यक्तीला फेट्याने पाणी पाजत असताना ते कसं,प्रदक्षिणा घालून पाणी पाजत्यावेळी तो माठ कोणत्या खांद्यावर ठेवायचा,त्याला दगडाने कोण कोच पाडणार हे बघणे,मुखाग्नी कसे द्यायचा हे असो,पुढे वेशीजवळ लिंबाच्या पाला घेऊन उभे राहणे असो या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत करत राहायचं...
यात कुठलेही वेगळेपण नसते,किंवा आपण खूप काही करतो हा भावसुद्धा नसतो,मयत व्यक्तीच्या प्रेमापोटी हे सर्व आपण करत असतो.हे करतांना एक भावनिक बंध निर्माण होतात व एक आगळं वेगळं समाधान भेटत असते त्यामुळे हे सर्व निरक्षण अन् त्यात सहभाग असतो,कारण हे बऱ्याच ठिकाणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे,नशिबाने हे सर्व करण्याची संधी आपल्याला भेटली आहे तर करावं असे मला वाटतं बस इतकचं...
Written by,
Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा