सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!
यापूर्वी माझे "गौताळा अभयारण्य" अन् सभोवतालचा निसर्गरम्य परिसर या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे,अनेक दैनिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली सोबतच माझ्या स्वताच्या ब्लॉगमाध्यमातून मी तुम्हाला नेहमीच "गौताळा अभयारण्य" अन् परिसर याब्बदल माहिती देत आलो आहेच...
तर असेच काही दिवसांपूर्वी मी आपणास कन्नड तालुक्यातील "काळदरी" या गावाबद्दल थोडक्यात माहिती दिली. बऱ्याच मित्रांनी या गावास भेट देण्याची इच्छा दर्शविली.
परंतु,काळदरी इतकं सुंदर अन् भौगोलिकदृष्ट्या आपले वेगळेपण सिद्ध करणारे गाव असेल तर आम्हाला कन्नड तालुका अन् शेजारील तालुक्यातील काही सुंदर,निसर्गसंपन्न,निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध ठिकाणांची माहिती माझ्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा बऱ्याच जणांनी व्यक्त केली...
यामुळे मी "कन्नड,सोयगाव,सिल्लोड आणि चाळीसगाव" यांच्या सीमेवर असणाऱ्या "अजिंठा डोंगररांगा" आणि "गौताळा अभयारण्य" परिसरात असलेल्या काही विशेष ठिकाणांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे.या माहितीसाठी मी अनेक वेळा या परिसरात भटकंती केली,अनेक दैनिक,प्रा.सुर्यवंशी सरांचे भ्रमंतीपर काही उपलब्ध झालेले व्हिडिओ अश्या अनेक माध्यमातून ही माहिती मी मिळवून,संग्रही करून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे...
कन्नड,सोयगाव,सिल्लोड या तालुक्याच्या सीमारेषा अन् या सिमारेषला लागून असलेला हा परिसर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील स्वर्ग.
या परिसरात आपल्याला जवळपास ६ किल्ले,६ लेण्या आणि बऱ्यापैकी मोठी असलेली ४-५ धबधबे आहेत. आणि पुरातन काळातील शेकडो मंदिरे आहेत...
किल्ले-
१) पाटणादेवी-कान्हेर गड.
२)अंतुर-किल्लेअंतुर किल्ला.
३)लोंजा किल्ला.
४)बनोटी-वाडी सुतांडा किल्ला.
५)सोयगाव-जंजाळा किल्ला.
६) जरंडी-वेताळवाडी किल्ला (ढाकल्या किल्ला,हळद्या किल्ला,सोयगावचा किल्ला).
६) कळंकी-पेडक्या किल्ला.
लेण्या-
१)कन्नड-पितळखोरा लेणी.
२)अंतुर किल्ल्याजवळ जोगेश्वरी लेण्या.
३)कान्हेरगड-जैन लेण्या.
४)बनोटी-धारेश्वर लेण्या.
५)वाडी सुतांडा जवळ -घटोत्कच लेण्या.
६) वेताळवाडी -रुद्रेश्वर लेण्या.
धबधबे-
१)देवदार धबधबा.
२)धारेवर धबधबा.
३)धवलतीर्थ धबधबा.
४)केदार्या धबधबा.
५)चंदननाला.
६)काळदरी व्ही व्हेली.
पुढील भागात हा प्रवास कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेल.
क्रमश:
Written by,
Bharat Sonwane
Photo Credit.
Gautala Wildlife Sanctuary All Tourist & Me
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा