बोलायचे टाळत मी राहिलो..!
बोलायचे टाळत मी राहिलो,
चेहऱ्यावरचे भाव मी उगाच मग
माझे सावरत राहिलो..!
अन् मी काय बोलू जिंदगीशी,
रोजच आज-उद्या जगण्यासाठीचा
करार तिच्यासोबत मी करत राहिलो..!
झाल्या हृदयावर खुणा कित्येक विश्वासघाताच्या,
सवय झाली आता घात सहण्याची वेळी वेळोवेळी
मला मीच आता सावरत राहिलो...!
नाही हितगुज करत मी जिंदगीशी,भविष्यातील स्वप्नांशी,
मीच मला प्रत्येकदा नव्याने आता
भूतकाळातील अंधारात पहात राहिलो..!
घे तू आता सावरायला या हातून सुटलेल्या क्षणांना,
वर्तमान काळाकडून भविष्यासाठी,भूतकाळात
बघितलेली स्वप्न आयुष्याकडे मी मागत राहिलो..!
झाली भेट कधी जर पुन्हा एकदा
आयुष्याच्या या पटावर,फीरण्या फासे
माझ्या आयुष्याचे बिजगिरीसम मग वाटच मी बघत राहिलो..!
गोळा वजाबाकी,बेरीज,गुणाकार झाला आयुष्यातील क्षणांचा,
जेव्हा उत्तर शून्य आले तेव्हा मात्र मी
फक्त आयुष्याकडे कोरड्या झालेल्या डोळ्यांसाठी आसवे मागत राहिलो..!
मी फक्त आयुष्याकडे आसवे मागत राहिलो...!
Written by,
©®Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा