पाटणादेवी भ्रमंती..! शुक्रवारी "भटका तांडा" समूहाचे प्रमुख "श्रीकांत उमरीकर" सर यांच्या समवेत पाटणादेवी येथे पाटणा भटकंती पूर्व नियोजन बैठकीस जाण्याचा योग आला अन् यामुळे "पाटणादेवी दर्शन" व तिथून जवळच असलेले "हेमाडपंथी महादेव मंदिर" बघण्याचा योगही आला..! पाटणादेवी कुलदैवत असल्यानं नेहमीच जाणे असते परंतु अलीकडे तीन चार वर्ष जाणे झालेले नव्हते.तो योग शुक्रवारी उमरीकर सर यांच्यामुळे जुळून आला.सध्या सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला असल्यामुळे पाटणादेवी सभोवतालचा सर्वच परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. महामार्ग एन.एज. २११ बऱ्यापैकी रुंदीकरण,चौपदरीकरण अन् नव्याने काम झाले असल्यामुळे "औरंगाबाद ते पाटणादेवी" हा जवळ जवळ १०० की.मी अंतराचा प्रवास सव्वा दोन तासात पूर्ण होतो.महामार्गावर तालुक्याच्या शहरांना लागून बायपास झालेला असल्याने वर्दळीचा प्रवास टाळत आपण सलग प्रवास करू शकतो. बऱ्यापैकी झालेला पाऊस त्यामुळे "कन्नड व चाळीसगांव" "मराठवाडा अन् खानदेश" विभागाला जोडणारा "औट्रम घाट" हा पूर्णपणे हिरवाईने नटलेला ...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!