आजच्या लेखमधून मी आपल्याला गौताळा अभयारण्य व जवळच असलेली पितळखोरा लेणी या दोन ठिकाणांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेल... #गौताळा_अभयारण्य... औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य.डोंगरदऱ्यांच्या कपारी खाणीतून वाट काढत,उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्या सारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो..आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आपण या ठिकाणी अनुभवाल,डोळ्यांचे पारणे फेडणारे असे विविधतेने नटलेले हे गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली.कन्नड तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो.कन्नडपासून अवघ्या 9 कि.मी. अंतरावरच अभयारण्य सुरु होते.तर चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर एक फाटा आहे.त्या...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!