मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्य आणि गणितं..!

आयुष्य आणि गणितं..! पहाटेच्या वेळी जितकं गाव रहाटीचं जग बोलकं असतं त्याच्या कैक पट सकाळच्या प्रहरी शहरात चालू असलेल्या घडामोडी बोलक्या असतात डोळ्यांना समजून घेण्याची कुवत असली, मनात त्याबद्दल विचार करण्याची अन् दृश्य निरीक्षण करून समजून घेण्याची कुवत असली की ; मग आपण आपले रोजचे कामधंदे सोडून व्यस्थ असलेल्या या लोकांच्या लाईफ स्टाईलचा भाग न होता शहरातील ही कॉर्पोरेट विश्र्वात जगणारी माणसं आणि गाव रहाटीचं जगणं जगणारी माणसं यांच्यामधील एक दुवा बनून जातो. या मधल्या माणसांची आयुष्यभर फरफट होत असते. तो धड शहराचा नसतो की धड खेड्यातला अन् कदाचित त्यामुळेच तो दोघांपेक्षा अधिकच सहनशील झालेला असतो अश्यावेळी. असो...! असच काहीसं आयुष्य मला लाभलं असल्यानं, माझी तारेवरची होणारी कसरत अन् आयुष्यात क्षणिक सुखाचा सोहळा करणं आता मला बऱ्यापैकी जमायला लागलं आहे. यासाठी मला कुठली किंमत मोजावी लागत नाही की, कोणाशी बोलावं लागत नाही. हो इतकं मात्र करावं लागतं की, खूप भटकंती करून हे क्षण साधावे लागतात. हल्ली शहर काही दिवसांपूर्वी मागे सुटले, त्यामुळे आता शहराची तेथील माणसांचं मला असलेलं आकर्षण प्रकर्...

life lessons..!

Life Lessons..!  आयुष्याकडे फार काही अपेक्षा न ठेवताच जगण्यात स्वार्थ आहे असं अलीकडे वाटू लागलं. विचार केला तर आयुष्यात अन् मनात एकाचवेळी असंख्य वादळे उठले आहे. त्यांना सावरतांना वेळोवेळी पण हळूहळू आयुष्य देऊ करणारे तडाखे, एक दिवस आयुष्यातून उठून जायला कारणी ठरतील असे दिसू लागलं आहे. नॉर्मल माणसांच्या आयुष्यात जसं सांज सरली की काळोख दाटून येतो. तसं माझ्या बाबतीत नाही माझ्या आयुष्यात सदैव काळोख दाटून आलेला  भासतो किंवा आहे. भर दिवसा शहरात कारण नसतांना अनवाणी भटकत राहतो, तितकंच रात्रीच्या गाढ झोपेतही. शहरं ओळखीची वाटू लागतात अन् दिवसा असलेला शहरातील हा प्रकाश गाढ झोपेतही डोळे दिपवून टाकतो. अलीकडे आयुष्य का जगतो किंवा जगण्याला कारण शोधत आहे. बऱ्याच गोष्टी नॉर्मल माणसांच्या आयुष्यासारखे एका सरळ रेषेत राहून आणि आयुष्याने समोर जे वाढून ठेवलं आहे ते स्वीकारून जगलो तर सगळं नॉर्मल आहे पण अश्या गोष्टीत मला स्वारस्य नाही. मी आयुष्याला घेऊन आखून ठेवलेले काही माईलस्टोन आहे अन् ती सर करत आयुष्य जगण्याची मनाला अन् शरीराला दोघांनाही सवय झाली आहे. त्यामुळं काही माईलस्टोन सर करत असत...

इंडस्ट्रिअल विश्व..!

इंडस्ट्रिअल विश्व..! आज एका अश्याच मीटिंगला उपस्थित होतो. दिवसेंदिवस शहरं वाढत चालली आहे, जसजशी शहरं वाढीस लागली तसतशी शहरात रोजंदारी उपलब्ध होण्यासाठी विविध कंपन्या, मॉल्स, छोटे-मोठे उद्योग समूह निर्माण झाले. शहरात बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाला. सुरुवातीला जवळच्या चार-दोन तालुक्यातील अन् आता हळूहळू जवळच्या तीन-चार जिल्ह्यातील, कामगार वर्ग औरंगाबाद शहर आणि शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करायला शहरात येऊ लागला. पाच दशकं पूर्ण होऊन गेली शहरातील बऱ्याच घरातील दोन पिढ्यांची हयात या कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार वर्ग म्हणून निघून गेली.  वेळोवेळी अनेक सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या अन् अनेकदा त्यांच्यावर अन्याय झाला. अनेकवेळा त्यांनी कामगार वर्गाची युनियन स्थापन करून प्रश्न मार्गी लावण्याचा विचार केला ; पण हे सर्व प्रश्न तितक्याच मर्यादित काळासाठी सुटले अन् पुन्हा जैसे थे अवस्था झाली. मी काही कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार नाही ; आयुष्यात हे जगणं फक्त तीन महिने जगलो आहे. परंतु या माझ्या कामगार बांधवांचे खडतर आयुष्य मी जवळून बघितल...

द्विधा मनाचे गुलमोहर..!

द्विधा मनाचे गुलमोहर..! माणसांच्या गर्दीत जेव्हा एकटं वाटायला लागतं, तेव्हा प्रत्येक त्या माणसाच्या आत मनाचा तळ गाठून त्याला भेटणं होतं. त्याचा चेहरा न्याहाळला जातो अन् असं पारखून मग आपल्याला हवासा माणूस आपल्या जवळ केला जातो. अश्या जवळ केलेल्या माणसाने आपल्याला नाकारले की मग आयुष्याची बिनकामी फरफट होते. मग गर्दीतही आपण एकटे राहून जातो. मग मात्र माणसांच्या सहवासातसुद्धा आपल्याला एकाकी वाटायला लागतं. अशी माणसं एकटे कधीच नसतात, जेव्हा एकटे असतात तेव्हाही ते त्यांना स्वतःला घेऊन आपल्या आयुष्यात आलेल्या जवळच्या माणसांना घेऊन विचार करत असतात. त्यामुळं ती एकटी अशी कधीच नसतात, जरीही वास्तव अवस्थेने मात्र ती एकटी दिसत असल. हे सर्व अश्या काळोखाच्या राती अजूनच स्पष्ट जाणवते. काही गोष्टींची खूप सहज न यावी इतकी सहज मग आठवण येऊ लागते. स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली सायकलवरून खाली जमिनीवर पडलेले वृत्तपत्र मी अंधारातच जमा करत आहे पण ; मला कोणी बघितले नाही. ही खूप दिवसांपूर्वीची दिलासा देणारी आठवण मला अश्या काळोखात खूप सहज अन् नेहमी येऊन जाते. सध्या स्थिर असलेल्या आयुष्याला घेऊन मग मला आपलीच कि...

पोलीस भरती अन् बरच काही ..!

पोलीस भरती अन् बरच काही..! मला माहितीये हा लेख कुठलेही वृत्तपत्र प्रसिध्द करणार नाही, त्यामुळे इथे देतोय. एक आवाहन सरकारला..! काल सायंकाळची गोष्ट खूप दिवसानंतर माझ्या तालुक्याच्या गावाला गेलो असल्यानं माझ्या जून्या मित्रांची भेट झाली. हल्ली शहरात माझ्या वयाच्या मुलांमध्ये साधारण तीन-चार वर्षानंतर आलेल्या पोलीस भरती, अग्निपथ योजनेतून अग्नीवीर भरतीतून भारतीय सैन्य दलात भरती, केंद्रीय,राज्य पातळीवर निम लष्करी दलातून होणारी भरती आणि महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक भरती होण्याच्या ध्येयाने शहरातील बहुतांश मुलं भरतीच्या तयारीला लागली आहे.  जसजशी भरती जवळ येत आहे, तसतसे तरुणांची ही संख्या वाढत आहे. शहरातील सर्व छोटी-मोठी मैदाने तरुणांच्या गर्दीने फुलून गेली आहे. सर्वजण जीव तोडून सराव करता आहेत. पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत १८,००० जागांसाठी जवळजवळ वीस लाख फॉर्म मुलांनी भरले आहे. त्यामुळं यावर्षी इतक्या मोठ्या पदांची भरती असूनही चांगलीच स्पर्धा असणार आहे. याऊपर खेडे गावातील मुलांची अवस्था तर खूप वाईट अशी आहे. खूप संघर्ष त्यांना भरती होण्यासाठी करावा लागत आहे. आज गावी येत असताना रस्त्य...

Reading बुक्स..!

Reading बुक्स..! माझा प्रवास वाचनाचा...! साधारण चार वर्षांपासून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. चार वर्षांच्या या काळात असंख्य कथा, कविता, ललित लेखन आणि इतर अश्या अनेक विषयांवर लेखन केलं. परंतु चार वर्षांच्या या प्रवासात अलीकडे कुठेतरी मला वाटायला लागलं होतं की, आपल्या लिखाणात कुठेतरी तोचतोचपणा येतोय आणि एक ठराविक मर्यादपर्यंतच आपण लेखन करतोय.  यात प्रगती होण्यासाठी आपल्या लिखाणाला आपल्याला योग्य तो आयाम देऊन. आपल्या मनाला जे लेखन हवं आहे ; जे वाचक वर्गाच्या मनावर भूरळ घालणारे ठरेल, अश्या लिखाणासाठी मला माझं एकूण जे थोडेफार वाचन आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल असा विचार मनात येऊन गेला.  जेणेकरून मी या माझ्या मर्यादित लिखाणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक वेगळं साहित्य माझ्या हातून निर्माण होईल. जे मराठी वाचकांच्या मनाशी रुंजी घालू बघणारं अन् त्याना हवंहवंसं वाटू लागेल. सोबतच समाजातील अनेक प्रश्न, घडामोडी, अश्या अनेक विषयांना घेऊन केलेलं लेखन मी वाचेल आणि या वाचनाच्या माध्यामतून चिंतन करेल. ज्यामुळे माझे विचार अजून प्रगल्भ होतील‌‌. अश्या या आणि अनेक विचारांना घेऊन...

Messi..! 💙

Messi..! 💙 #LionelMessi ...❤️ फुटबॉल म्हंटले की माझ्यासह जगातील असंख्य चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनलेला लिओनेल मेस्सी हा खेळाडू आठवतो. फुटबॉल म्हंटले की, आपसूकच फुटबॉल=मेस्सी हे समीकरण जुळून येते. गेल्या आठवड्यात फुटबॉल विश्वात काही घडामोडी घडल्या. मेस्सीचा अर्जेंटिनासाठी खेळण्याचा प्रवास या विश्वचषकाच्या नंतर संपुष्टात येणार असं कळलं. तितकेच वाईट आजही वाटले, जितके बार्सिलोनाकडून तो खेळत असतांना अचानक त्याला बार्सिलोना क्लब सोडावा लागला होता. असो यशाच्या शिखरावर असताना जिथे सर्व माईलस्टोन सर केले असतात, तेव्हा कुठेतरी थांबून विसावा घ्यायला हवा असतो. ही जाणीव योग्य वेळीच झाली की ठीक असते अन् तो निर्णय योग्य वेळी घेतला की, आयुष्याला घेऊन मग आपली दमछाक होत नाही. प्रथमतः तर दमछाक हा शब्द मेस्सीसाठी बनलेलाच नाहीये. गेली कित्येक वर्ष तो धावतोय धावतोय अन् धावतोय. पण त्याचं हे धावणे आता काही अंशी थांबणारं होतं, कमी होणारं होतं. हळू हळू तो आपली वाटचाल आता विसावा घ्यायला हवा या भावनेकडे करतो आहे. जी की सुखद शेवट देऊ करणारी ठरत आहे. अर्जेंटीनाचा स्टार फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पेन...

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..! सायंकाळ झाली की अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर माझं नॉर्मल आयुष्य मला अजूनच गुंतागुंतीचं वाटू लागतं. मग मी काळोखाला जवळ करत भटकत राहतो खाचखळगे असलेल्या आडवाटांना. शहरे ओळखीची झाली, काही अंशी शहरातील माणसंही ओळखीची झाली. पण मला का कुणास ठाउक यातील कुणालाच जवळ करावंस वाटलं नाही,का.? हे गणित न उलगडणारे होते. शहरातील माणसं अन् त्यांच यंत्रवत असणं किंवा तसं आयुष्य जगणं मला नेहमीच जिव्हारी लागणारं होतं. पण पैसा माणसाला अक्कल शिकवतो अन् मग मी ही या यंत्रवत आयुष्याचा बळी पडलो. होत काही नाही, बस सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलं की, येताना औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या यंत्रांची घरघर अंगावर येते. आयुष्याला कंटाळलेले अन् गावाकडे पर्याय नाही म्हणून शहरात आलेल्या तरुणांचे रातदिवस अनवाणी पायांनी चालून, सेफ्टी शूजच्या पावलांनी गुळगुळीत झालेले रस्ते जवळची वाटू लागतात. ऐन तारुण्यात लग्न जुळेना म्हणून गावच्या बक्कळ पोरांनी शहरं जवळ केली, पोरींच्या बापांनी पोरांची ही चालही ओळखली आणि पोरांचे जुळता जुळेना.  मग अश्यात अनेकजन दारूच्या आहारी गेली, अनेकजण रात्रंदिवस १२...

Industrial सुट्टी..!

Industrial सुट्टी..! कालची सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलो अन् उद्या सुट्टी म्हणून उद्याच्या दिवस आराम याच कल्पनेत कंपनीतून सेक्युरिटी गार्डने चेकआऊट केलं अन् मी बाहेर पडलो. जोडीदार मागेच होता, गाय छाप खाणारा आहे तो. शिफ्ट सुटली की मग बाथरूममध्ये जाऊन त्याची गाय छाप बुटाच्या आत घालतो, अन् मग सेक्युरिटी गार्डच्या चेकींग कॅबिनकडे तो वळतो. साधारण वर्षभरापासून माझा रूम पार्टनर आणि इथे कंपनीतही सोबती आहे. दोन वेळा हजार-हजार रुपये फाईन भरून आणि पुढे गाय छाप जवळ सापडली तर कंपनीतून काढून टाकीन. या सुपरवायझरच्या धमकीलाही तो जुमानत नाही आणि बिनधास्त गाय छाप कंपनीच्या आत घेऊन येतो. त्याची ती तलफ आणि त्याचं ते गाय छाप लपवण्याचं कौशल्य बघितलं की, असं वाटतं इतकं डोकं त्याने कंपनीत वापरले असते तर नक्कीच सुपरवायझर झाला असता. आणि मग सगळ्या गाय छाप खाणाऱ्या पोरांना मोकाट सूट त्याने दिली असती. असो मी बाहेर पडलो गेटच्या बाहेर तिसऱ्या शिफ्टसाठी मुलं कुडकुडत बाहेर कंपनीच्या गेटवर उभी होती. काही पाच-सहाजण नवखेच होते अन् कंपनीत काम भेटन या आशेनं ते आज दिवसभरातून तिसऱ्यांदा फर्स्ट,सेकंड आणि आता थर्ड श...

Dark Asenthic..! 💙

Dark Asenthic..! 💙 भर दुपारची वेळ केव्हाच होऊन गेली, आयुष्याला घेऊन भविष्यात काय करायचं..? हा प्रश्न काही केल्या सुटता सुटत नाहीये. अख्खी रात्र या प्रश्नाने जागून काढली अन् पहाटेचा सूर्योदय झाला तेव्हा कुठे डोळे नकळत लागून गेले ते मगासपर्यंत. हल्ली लिहायला मन धजावत नाही. कारण माझं लिहणं दुसरं-तिसरं काही नसून माझ्याच आयुष्याचा मी पटावर मांडलेला खेळ असतो. त्यामुळेनं एक अनामिक भिती वाटते आता इथे लिहायची. कारण माझं हे "डार्क असेंथिक" प्रकारातील लेखन कुणी वाचलं आणि जर त्याला या वाचनाचं वेड लागलं. तर ; तो संपूर्णपणे मी ज्या अवस्थेत आयुष्य जगतो, त्या अवस्थेला यायला कमी करणार नाही.पण हे खूप वाईट्ट आहे. खूप काही सोसावं लागलं आहे,खूप काही सोसतो आहे हे सगळं कागदावर किंवा लॅपटॉपवर टाईप करत असतांना त्यामुळं आता इथे हे असं लिहायचं बंद केलं आहे. असो रात्रभर त्या प्रश्नाने डोळा लागला नाही. पहाट झाली तेव्हा मात्र साखर झोप लागावी तसे आपसूकच डोळे बंद होऊन गेले, ते आतापर्यंत‌. इतक्यावेळात पाच-सहा फोन्स,असंख्य मॅसेज येऊन गेले. एरवी माझा अन् त्यांचा काही संबंध नसतोच.  डोळ्यांना दिसलं,...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..!

आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..! आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..! १९८५ साली औरंगाबाद येथे बजाज कंपनीचा प्लांट उभारण्यात आला आणि औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख मिळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून बजाज उद्योग समूहाचा जेव्हा-जेव्हा विचार केला जातो तेव्हा-तेव्हा अनावधानाने औरंगाबाद शहराचे नाव येतेच. इतकं जवळचं नातं हे बजाज उद्योग समूह अन् औरंगाबादकरांचे आहे. बजाज उद्योग समूहाने औरंगाबाद शहराचा विकास असो किंवा, वाईट राजकारण असो किंवा वाईट अर्थकारण, शहराचा वाईट काळ हे सगळे दिवस पाहिले. परंतु या अश्या वाईट काळातही बजाज कंपनी सामान्य औरंगाबादकरांच्या सोबतीनेच होती. औरंगाबाद शहर पर्यटन क्षेत्रात "पर्यटन राजधानी" म्हणून आपले स्थान कायम ठेवून होतीच. परंतु आता नव्याने "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही औरंगाबाद शहराची वेगळी ओळख झाली होती.   तिला कारणीभूत औरंगाबाद शहराच्या लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये बजाज, व्हिडिओकॉन, लुपिन लिमिटेड, गरवारे, कॉस्मोफिल्म, फायझर, वोखार्डट, कोलगेट, जॉन्सन अँड जॉन्सन अश्या अनेक कंपन्या ज्या त्या काळात औ...

अनायसे शहराचे आकर्षण ..!

अनायसे शहराचे आकर्षण..! अनायसे शहराचे आकर्षण वाटते अन् मग नकळत शहरं जवळ केली जातात.एक दिवस,दोन दिवस,तीन दिवस अन् मग याही वेळी सोय झाली नाही,म्हणून किती दिवस शहराच्या वाटा भटकत रहायचं ; म्हणून गावाकडच्या परतीच्या वाटेला प्रवास सुरू होतो पुन्हा एकदा..! जेव्हा हा प्रवास सुरू होतो तेव्हा मनात एकच प्रश्न असतो,अजून किती दिवस माझं हे असे गाव शहर,गाव शहर हेलपाटे चालू राहणार..? छान वाटतं खरंच इथलं हे जग,कॉर्पोरेट विश्व असो की गुळगुळीत रस्ते,मान वर करून बघत रहाव्या अश्या उंचउंच इमारती..! एखाद्या जागी आपली आयुष्याची जागा फिक्स होईल असं एकही स्थान का आपल्याला या शहरात इतकं भटकुनही भेटत नाहीये..!  हा विचार मग मनात असंख्य प्रश्न निर्माण करून जातो..! कधीतरी वाटतं की आपली कुवतच नसावी हे असं चकचकीत शहर बघायची,तिथं वास्तव्य करायची.हल्ली परतीच्या वाटेला लागलं की काहीवेळ पुन्हा बस थांब्यावर थांबून कुठलीशी जाहिरात माझे डोळे शोधत असतात..! माझ्यासारख्याच कुण्या बेरोजगाराने एक दिवसाचा रोजगार मिळाला म्हणून ती जाहिरात लावलेली असते..! जाहिरात अशी असते की कमवा महिन्याला १५०००-१८००० रुपये,काम काय त...

रूम पार्टनर..!

रूम पार्टनर..! काल रात्री साडे अकराला कामाची शिफ्ट सुटली,कंपनीच्या गेटवर आलो तेव्हा जमिनीला साधळा लागेल असा पाऊस चालू होता.पुन्हा पाऊस वाढेल म्हणून अंधारातच धपाधप पावलं टाकत,जवळजवळ पळतच रस्त्यानं कामगार नगराच्या अन् माझ्या रुमच्या दिशेनं निघालो.एरवी हे रोजचं आहे,त्यामुळे याचं मला कुठलं सोयरसुतक नाही..! दोन-अडीच कीमीची धावपळ करून अखेर रूमवर पोहचलो,अंगावर शर्ट घामाने की हळूवार पडणाऱ्या पावसाने ओलाचिंब झाला हे काही समजलं नाही.मित्र तिसऱ्या शिफ्टसाठी कंपनीत निघून गेला होता,दरवाज्याला घातलेली कडी खोलली आणि आल्या-आल्या कॉटवर पडलो..! जीव दिवसभराच्या कामानंतर पार थकून गेला होता,पडल्या पडल्याच एका पायाने दुसऱ्या पायातील बुटाशी खेळ करून दोघांना काढले अन् पायानेच कॉटखाली लोटून दिले.सोक्स हाताने काढून गादीखाली खोचुन दिले अन् काही अर्धा तास निपचित पडून राहिलो,डोळे लावून शांत-शांत..! खिडकीच्या तावदनातून हळूवार निवांत गार वारा वाहत माझ्यापर्यंत येत होता अन् निपचित पडल्या जागी अंगाला गारवा झोंबत होता.गारव्याने अंगावर शहारे येऊ लागले होते,काही पंधरा-वीस मिनिटांनी जरासे ताजेतवाने वाटले..! अन...

झूल्या आई..! भाग-तीन

झूल्या आई ..! भाग - तीन  पहाटेची उन्हं मी बसल्याठीकाणी माझ्या डोळ्यावर येऊ लागली होती. शिवनामायच्या वाहत्या पाण्यात ती सूर्यकिरणं पडत अन् तीही आरश्याप्रमाणे डोळ्यावर चमकू लागली होती.  सोन्याबाबा माझ्याजवळ बसल्याजागी फराळाचं करून, खरगटे झालेले भांडे चुल्हीतल्या राखूंड्यानं नारळाच्या काथीनं खसाखस घासत होता. झोल्याआई दूरवर असलेल्या बांबूच्या वनात पोसलेल्या बांबूना खाटकासारखं तिच्या हातात असलेल्या धारदार कत्तीनं बांबूचे खांडं करत होती. एकनाथ बाबा टूपातून नदीच्या थडीला येऊन आपलं जाळं ओढीत अन् त्यात आलेल्या मासोळ्या,मांगुर मासे,खेकडे डालग्यात टाकत होता. मध्येच जाळ्यात एखादा छोटा साप जाळ्यात अडकून येऊन जायचा मग एकनाथ बाबा त्याची शेपटी धरून जोरात जमीनीवर दोन-तीन वेळा आपटत दुसऱ्या क्षणाला साप मरुन गेलेला असायचा. मी बसल्या जागेवरून त्यांचं हे चालू असलेलं काम न्याहाळत होतो. अधूनमधून वाऱ्याची झुळूक माझ्या दिशेनं येऊन जायची अन् क्षणिक सुखाचा गारवा मला देऊन जायची. सोमवार असल्यानं गावातल्या बायका,पुरुष मंडळी महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला येत होते. मनोभावे पाणी घालून,बेल पान वा...

झूल्या आई..! भाग-एक

झूल्या आई..! भाग-एक  पहाट सरायला तसं मी गावच्या एकांगाला असलेल्या महादेवाच्या देऊळात दर्शनाला म्हणून शिवनामायच्या अंगाला असलेली वाट जवळ करू लागलो. गावातली माय-बाप वडील माणसं पहाटेच काकड्याला म्हणून मंदिराची वाट जवळ करतात.मी बऱ्याच दिवसांच्या उपर गावाला आल्यानं आज देऊळात जावं म्हणून देऊळाच्या वाटेला लागलो..! गावाला यंदाच्या सालाला चांगलीच बरसाद होवून गेली होती,म्हणून शिवना माय दुथडी भरून वाहू लागली होती.शिवना मायच्या दोन्ही अंगाला बेसरमाची झाडं डोक्यावरून फिरली होती,त्यात अधून मधून सापाची पिल्ल खेळतांना दिसायची,गावची लहानगी मुलं सलगी करून पुलावरून त्यांचा हा खेळ बघत बसलेली असायची..! गावचा सगळ्यात वयस्कर सोन्या बाबा अजूनही बारा महिने नदीच्या पात्रात नहानं करतो,जोवर तो गावात हाय,जिंदा हाय तोवर गावाला दुष्काळ नाय असं गावची जुनी माणसं,बुडीबापुडे लोकं म्हणतात..! कारण विचारलं तर म्हणतात की सोन्या बाबा म्हशीच्या डोहात उभे राहून दररोज बारा महिने सूर्याला पूर्वेस तोंड करून अर्ध्य देतो,म्हणून सूर्यदेवाची आपल्या गावावर कृपा हायसा.गावला रोगराई नाय की दुष्काळ नाय..! मी अनवाणी पायानं ...

झूल्या आई..! भाग दोन

झूल्या आई..! भाग - दोन यंदाच्या सालाला गावात मोप पाऊस पडून गेल्यामुळे शिवना माय दुथडी भरून परंतु संथपणाने वाहत होती. शिवना मायच्या तीरावर यशवंतराव चव्हाण दादा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी असंख्य दगडी पूल बांधलेली होती. आजही ती चांगल्या स्थितीत होती. आता गावच्या बायका तिथं रोजचं धुणे घेऊन धुवायला यायच्या, त्यांच्या पारगभर चालणाऱ्या गप्पा. गप्पा कसल्या आपल्याच बालपणीच्या आठवणी, माहेरच्या आठवणी एकमेकींना त्या सांगायच्या अन् घटकाभर तितकंच आपल्या कष्टाळू जगण्याचा त्यांना मग त्यातून विसर पडायचा. मी महादेवाच्या देउळातून नदीचं संथपणे वाहणं, बायकांच्या गप्पा, रघुनाना कोळी यांचं टूपात बसून नधडीत मासं पकडणं न्याहाळत बसलो होतो. सोन्या बाबाला आज एकादस असल्यानं तो मंदिराच्या एकांगाला असलेल्या त्याच्या खोलीत शाबूदाना करायचा म्हणून चुल्हंगन पेटीत बसला होता. नदिच्या थडीला एकांगाला बांबूच्या बेटाचं दाट वन होतं. नदीला मोप पाणी असल्यानं बांबूचे बेटं मोप पोसले होते, दोन्ही हाताच्या तळव्यात बसणार नाही अशी काही बांबू त्यात झाली होती. या बांबूच्या वनाची अन् गावच्या एकुलत्या एक टोपले करणाऱ्या झ...