औद्योगिक वसाहतीत भेटलेला अवलिया..! आयुष्याला घेऊन आपण कधीतरी खूप छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन समाधानी असतो तर कधीतरी आपण आपलं आयुष्य गुंतागुंतीचे करून घेतो अन् त्यातून मिळणारा सर्वोच्च कोटीचा जो आनंद आहे त्यात आपण खुश होत असतो. अलिकडे आयुष्याला घेऊन जेव्हा विचार करतो तेव्हा हा विषय येतो अन् याबाबतीत खूप खोलवर विचार केला जातो तेव्हा आयुष्यात आपण आतापर्यंत एकतर खूप काही गमावलं किंवा येथून पुढे सर्वच अलबेल असले तर खूप काही मिळवू शकू याची प्रचिती येते..! साधारण बाविशित असेल तेव्हा अाेद्योगिक वसाहतीत पहिल्यांदा कामाला गेलो कामाच्या अन् पगाराच्या बाबतीत सतत उंचीचा आलेख बघत असल्यानं,काही गोष्टी मला गौण वाटायच्या.साहजिक आहे त्यासाठी तितकी मेहनत करत असायचो,आयुष्याला,आयुष्यात आलेल्या क्षणांना तितके पिळून काढायला आवडायचं,मेहनत करायला आवडायचं..! नेहमीप्रमाणे असेच एक दिवस दुसऱ्या शिफ्टमधले काम करून सुट्टी झाली अन् घरी परतायची वेळ झाली.साधारण पावणे बारा वाजलेले होते,कंपनीच्या गेट बाहेर आलो अन् थंडीचे दिवस असल्यानं हुडहुडी भरून आली.वर म्हंटल्याप्रमाणे नशिबाने खूप गोष्टी मला माझ्या आयुष्या...
माझ्या मनातल्या भावनांना लेखणीच्या सहारे कैद करण्यासाठी माझा हा ब्लॉग..! या ब्लॉग माध्यमातून मी मराठी साहित्यात नवोदित लेखक म्हणून जे काही लेखन केलेलं आहे.सोबतच माझ्या मनातील स्वगत,वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असलेल्या माझ्या प्रतिक्रिया,पर्यटन,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर मला काय वाटते,माझे या विषयांवर असलेले प्रामाणिक मत,विचार मी या ब्लॉग माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे..! तेव्हा एकदा नक्कीच माझ्या या ब्लॉगला तुम्ही एकदा भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा..!